चौकशी अधिकाऱ्यांची लावली चौकशी…तरीही रेंगाळली चौकशी…
पंचायत समिती निलंगा येथील अजबच कारभार
निलंगा (प्रतिनिधी) : निलंगा तालुक्यातील पंचायत समिती येथील पदभार हा प्रभारी गटविकास अधिकारी सोपान अकेले यांच्या हाथी आल्यापासून तर गजबच कारभार सुरू आहे. तालुक्यातील एका ग्रामीण भागातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून झालेल्या भ्रष्टाचार प्रकरनाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या चौकशी अधिकाऱ्यांचीच चौकशी कररण्याची वेळ आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, निलंगा तालुक्यातील मौजे हणमंतवाडी (अ.बु.) येथील ग्रामपंचायत कार्यालयात मागील दोन वर्षांपासून पंधराव्या वित्त आयोग व इतर निधीचा दुरुपयोग करून तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी फक्त कागदावरच विकासकामांच्या माध्यमातून लाखों रुपये खर्च करुन प्रत्यक्षात मात्र जनतेची आणि शासनाची फसवणूक केलेली आहे. या फसवणूक प्रकरणाची तक्रार एका तालुक्यातील कार्यकर्त्याने गटविकास अधिकाऱ्यांना करुन जवळपास आठ महिने झाले तरी पण चौकशी अधिकाऱ्यांनी चौकशी करण्यास टाळाटाळ केली त्यामुळे त्या चौकशी अधिकाऱ्यांचीच चौकशी लावण्याची वेळ गटविकास अधिकाऱ्यांना आली तरी पण ती चौकशी सुध्दा रेंगाळली असून त्यामुळे तालुक्यातील अजब कारभाराची चर्चा जोरात सुरु आहे.
एकीकडे महाराष्ट्र सरकारने मात्र गतीमान सरकार, विकासकामे जोरदार च्या भरपूर जाहीराती तर केल्या पण जिथे खरोखरच भ्रष्टाचार झाला तिथे मात्र सेटलमेंट सुरु केल्याचे दिसुन येत आहे. एकीकडे सरकार जनतेच्या सोयीसुविधांसाठी थेट ग्रामपंचायत स्तरावर लाखों रुपये निधी देत आहे पण गावांत मात्र राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेटींग करून अनेक विकासकामे फक्त कागदावरच होत आहेत त्यामुळे त्या निधीचा दुरुपयोग होत आहे. आणि अधिकारी निष्पक्षपणे चौकशी सुरू केल्या तर खरोखरच विकासकामे झाली किंवा नाही हे मात्र नक्कीच कळणार आहे. त्यामुळे प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांनी शासनाच्या अधिकाराचा परी पुर्णपणे वापर करून गैरप्रकार करत असलेल्या भ्रष्टाचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी जनतेची भावना व्यक्त होत आहे.