लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

उदगीर(एल.पी.उगीले): भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई संचलित लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.संस्कार केंद्रप्रमुख अंकुश मिरगुडे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ स्वयंसेवक प्रमोदजी कुलकर्णी तर,प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समिती सदस्य बालाजी चटलावार, स्थानिक समन्वय समिती सदस्य,संतोषजी कुलकर्णी,अर्थ समिती अध्यक्ष गजानन जगळपुरे,बालवाडी समिती अध्यक्ष श्रीमती अंजलीताई नळगीरकर व सदस्य श्रीमती सुलभाताई कुलकर्णी उपस्थित होते.
पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.व्यासपीठावरील मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले.स्वातंत्र्यदिना निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांची भाषणे झाली.कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक प्रमोदजी कुलकर्णी यांनी स्वातंत्र्यदिना निमित्त स्वातंत्र्य म्हणजे काय?स्वधर्म,स्वराष्ट्र व स्वराज्य या संकल्पना स्पष्ट केल्या.भारत देशामध्ये श्रीकृष्ण,श्रीराम यांचा जन्म झाला म्हणून आपल्या देशाला देवभूमी म्हटले जाते तसेच,अनेक संतांचा जन्म या भूमीवर झाला म्हणून,या भूमीला पुण्यभूमी असे म्हटले जाते.ज्ञानाच्या बाबतीमध्ये आपला देश विश्वगुरू आहे.आपल्या देशाला सर्व विश्वामध्ये सक्षम करण्यासाठी आपण सदैव देश कार्यासाठी वेळ दिला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी बलोपासना करावी.असे मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपपर भाषणामध्ये शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त उत्कृष्ट भाषण केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.पालकांचेही कौतुक केले.भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक थोर स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेले नाही.आपल्या देशाकडे कोणीही वाकडी नजर करून बघू नये,यासाठी आपण सदैव दक्ष राहिले पाहिजे. राष्ट्रसेवा म्हणून आपण काय काय करू शकतो,याचा सर्वांनी विचार करण्याचे आवाहन केले.

प्रास्ताविक मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी केले.सूत्रसंचालन श्याम गौंडगावे यांनी केले तर,आभार सौ.सविता बोंडकेबाईंनी मानले.

About The Author