विनिता पन्‍हाळे-पवार यांचीसरकारी अभियोक्‍तापदी निवड

विनिता पन्‍हाळे-पवार यांचीसरकारी अभियोक्‍तापदी निवड

पुणे (केशव नवले ) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्‍या 2022-23, परीक्षेतून विनीता पन्हाळे-पवार यांची सहाय्यक सरकारी अभियोक्तापदी (क्लास वन ऑफिसर) निवड झाली आहे. पथक परिश्रम घेउन त्‍यांनी हे यश मिळविले आहे.
कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत असतांना विनिता पन्‍हाळे-पवार यांनी वकीली सुरु ठेवली होती. दोन्ही मुलांना सांभाळत त्‍यांनी एमपीएससीच्‍या परीक्षेचा अभ्यास सुरु ठेवला होता. वकीली, अभ्यास व कोर्टातील जबाबदाऱ्या हे सर्व सांभाळतांना त्‍यांना पती अभियंता कुणाल तानाजी पवार यांची मोलाची साथ लाभली. वडील निवृत्त सरकारी वकील उल्हास पन्‍हाळे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतांना त्‍यांनी देदिप्यमान असे हे यश मिळविले आहे. विनिता या लहानपणापासूनच अभ्यासू. वडिलांच्‍या सल्‍यानुसार प्रथम एलएलबी आणि लग्नानंतर एलएलएम शिक्षण पूर्ण केले. विशेष म्‍हणजे पन्‍हाळे कुटुंबात तिन्‍ही मुली असून, तिघींनीही उच्च शिक्षण घेऊन कुटुंबाचा नावलौकिक वाढविला आहे. विनिता यांच्या या यशाबद्दल सर्व स्‍तरातुन त्यांचे कौतुक होत आहे.

About The Author