साप हा माणसाचा ‘शत्रू’ नसून ‘मित्र’ आहे – सर्पमित्र श्याम पिंपरे
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात नागपंचमी सण उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मंचावर उपस्थित कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रमोदिनी रेड्डी, प्रमुख अतिथी तथा सर्पमित्र शाम पिंपरे, योगेश तेलंगे, आशिष कल्लुरे ,प्रशालेचे मुख्याध्यापक अंबादास गायकवाड ,पर्यवेक्षक कृष्णा मारावार ,लालासाहेब गुळभिले, माधव मठवाले ,अभ्यास पूरक मंडळ प्रमुख बालाजी पडलवार, मीनाक्षी कस्तुरे उपस्थित होते.
भारतात एकूण 278 सापाच्या जाती असून मराठवाड्यात चार विषारी जाती सापाच्या आढळतात.घोणस, नाग, मण्यार, परड हे विषारी साप आहेत.साप आत्मसंरक्षणासाठी हल्ला करतो. साप हा शत्रू नसून मित्र आहे. सर्पदंश झाल्यास प्रथमोपचार कसा करावा. तसेच तस्कर,डुलक्या घोणस,नाग याविषयी विस्तृत माहिती सर्पमित्र शाम पिंपरे यांनी सांगितली. नागपंचमी सणाविषयी माहिती व त्याचे महत्त्व अध्यक्षीय समारोपात प्रमोदिनी रेड्डी यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेदांत व सिद्धांत मोरखंडे, प्रा. गायत्री कळसाईत, स्वागत परिचय श्रीशा सोनटक्के, आभार संगम बोळेगावे यांनी मांडले. तसेच नागपंचमी सणाविषयी गीत प्रिती शेंडे यांनी सादर केले. कार्यक्रम प्रमुख संदीप बोधनकर, सविता कोरे यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. याप्रसंगी 5 वी ते 10 वी चे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.