कृषि महाविद्यालयात नूतन विद्यार्थीसाठी पदवीपूर्व अभिमुखता कार्यक्रम संपन्न

कृषि महाविद्यालयात नूतन विद्यार्थीसाठी पदवीपूर्व अभिमुखता कार्यक्रम संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी संलग्नित कृषि महाविद्यालय , डोंगरशेळकी (तांडा), उदगीर येथे , शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रवेशीत बी.एस्सी. (मानद) कृषि पदवी शिक्षणासाठी प्रवेशित नूतन” विद्यार्थी – पालक – शिक्षक” मेळाव्याचे आणि ” अभिमुखता” कार्यक्रमाचे महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजन करण्या आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंगदराव सूर्यवंशी, प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून उदगीर येथील शिवाजी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अरविंदजी नवले, उपप्राचार्य अशोकराव पाटील, डॉ. आनंद दापकेकर, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. वसीम शेख, शिक्षण विभाग प्रभारी प्रा. सुदाम डफडे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न सर्वपल्ली राधाकृष्णन व हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून रितसर उद्घाटन करण्यात आले.
नूतन प्रवेशित विद्यार्थ्यांना कृषि शिक्षण अभ्यासक्रम, विषय व विषयनिहाय मूल्यमापन, महाविद्यालयात उपलब्ध सुविधा, विविध कृषि शिक्षण विभागाची ओळख व कार्य पध्दती आणि उच्च विद्या विभूषित प्राध्यापकाची ओळख तसेच विद्यार्थी-पालक व शिक्षकांमध्ये संवाद व्हावा, या उद्देशाने पदवी पूर्व अभिमुखता व विद्यार्थी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात सर्वपल्ली राधाकृष्ण व वसंतराव नाईक यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली.
डॉ. अरविंदजी नवले त्यांनी उद्घाटनपर मार्गदर्शनातून उपस्थित नूतन विद्यार्थी, पालकांना संबोधित केले की , शेती , कृषि शिक्षण , कृषि उद्योग – व्यवसाय, कृषि तंत्रज्ञान – संशोधन , प्रशासकीय सेवा या व इतर विविध क्षेत्रांमध्ये कृषि पदवीधरांसाठी अमाप संधी उपलब्ध असल्यामुळे , ध्येय निश्चित करून विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांमध्ये यश संपादित करावे.अशा शुभेच्छा दिल्या .
प्राचार्य ङॉ.अंगदराव सूर्यवंशी यांनी या महाविद्यालयात प्रथम वर्षात प्रवेशित नूतन विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे स्वागत केले . जगातील इतर कोणत्याही पदवीधरांपेक्षा कृषि पदवीधरांनी स्वतःला श्रेष्ठ समजावे . कारण , कृषि पदवीच्या चार वर्षे कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण व व्यावसायिक कृषिचे तंत्रज्ञान आत्मसात केल्यामुळे, सध्याच्या पारंपारिक शेतीला शास्त्रशुद्ध तंत्रज्ञानाची जोड दिल्यामुळे , शेती व्यवसायाचा नक्कीच कायापालट होणार आहे . विद्यार्थ्यांनी , पदवी शिक्षणा दरम्यान ध्येय निश्चिती व उपलब्ध वेळेचे सुयोग्य नियोजन करून , कृषि पदवीचे शिक्षण गुणवत्तेसह यशस्वीरित्या पूर्ण करावे , असे आवाहन केले .
महाविद्यालयातील शिक्षण विभागाचे प्रभारी प्रा. सुदाम ङफडे यांनी , उपस्थित नुतन विद्यार्थी – विद्यार्थिनी व पालकांना , कृषि पदवीच्या चार वर्ष कालावधीतील सत्रनिहाय शैक्षणिक अभ्यासक्रम , परीक्षा पद्धती , मूल्यांकन व गुणांकन , नियमित उपस्थिती , क्रीडा सुविधा व व्यायामशाळा , महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी पाळण्याची शिस्त , विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम , उपलब्ध सोयीसुविधा आणि इतर अनुषंगिक उपक्रमाबद्दलची सविस्तर माहिती दिली .
या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजनासाठी महाविद्यालयाचे आहरण व संवितरण अधिकारी ङॉ.आनंद दापकेकर, ङॉ. सुनिल पवार , ङॉ. वसीम शेख, ङॉ. दिपाली कोकाटे, डॉ.शिवाजी माने, ङॉ. दिपक पानपट्टे, ङॉ. शिवशंकर वानोळे, ङॉ. सागर खटके, ङॉ.विजय शिंदे, प्रा. शितल पाटील, प्रा. एस.एस नवले, ङॉ.पि.एच.राठोङ, समस्त प्राध्यापक व प्राध्यापीका, प्रक्षेत्रावरील व कार्यालयीन कर्मचारीवर्ग यांनी बहुमोल योगदान दिले. ङॉ.सुनिल पवार यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार मानल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

About The Author