प्रा.ज्ञानेश्वर हंडरगुळीकर यांच्या “आळ आणि काळ”कथासंग्रहास उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.ज्ञानेश्वर हंडरगुळीकर यांच्या बहुचर्चित “आळ आणि काळ”या कथासंग्रहास डोंबिवली चा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय कथासंग्रह स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पुणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा सुप्रसिद्ध कवयित्री राजश्री बोहरा यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
डोंबिवली च्या महात्मा फुले नगरातील संत ज्ञानेश्वर सभागृहात हा सोहळा संपन्न झाला. मंचावर ज्येष्ठ साहित्यिक राम नेमाडे,संपादक सुभाष झेंडे,शशिकांत सावंत आदी उपस्थित होते.ज्ञानेश्वर हंडरगुळीकर हे मराठीतील विविधांगी लेखन करणारे साहित्यिक असून त्यांना आजवर विविध साहित्यिक-सामाजिक संस्थांचे एकूण ६६ पुरस्कार मिळाले आहेत.तर “आळ आणि काळ” या कथासंग्रहास अनुक्रमे मिळालेला हा दहावा राज्यस्तरीय उत्कृष्ट कथासंग्रह लेखन पुरस्कार होय.
यापूर्वी या कथासंग्रहास पुणे विद्यापीठ अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राचा समाजप्रबोधन पुरस्कार, कोल्हापूर येथील मराठी साहित्य मंडळाचा उत्कृष्ट कथालेखन पुरस्कार, सोलापूर येथील मुक्ता साळवे साहित्य लेखन पुरस्कार, तरवडी नेवासा येथील ग्रामीण पत्रकार स्व.मुकुंदराव पाटील सत्यशोधक लेखन पुरस्कार, करकाळा नांदेड येथील लोकसंवाद ग्रामीण साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा दामाजीनगरचा स्व.मसाजी शिवशरण उत्कृष्ट कथालेखन पुरस्कार,ननागपूर च्या जागतिक आंबेडकरवादी महामंडळाचा ज्येष्ठ कथाकार स्व.बाबुराव बागुल कथालेखन पुरस्कार, मुक्ता फाउंडेशन कोल्हापूर चा समाजप्रबोधन लेखन पुरस्कार, चंद्रपूर चा शब्दांगण साहित्य लेखन पुरस्कार हे पुरस्कार मिळाले असून डोंबिवलीच्या मासिक मोहिनीराज ने “आळ आणि काळ”या कथासंग्रहास दिलेला सन्मानाचा हा अनुक्रमे दहावा राज्यस्तरीय उत्कृष्ट कथासंग्रह लेखन पुरस्कार होय. या लक्षवेधी कथासंग्रहास हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के,रामचंद्र तिरुके,जयदीप सोनखासकर, विलास सिंदगीकर,रामदास केदार,,अंबादास केदार ,धनंजय गुडसुरकर,प्राचार्य बी.एम.जाधव, रजनीकांत गडांबे इत्यादींनी हंडरगुळीकर यांचे अभिनंदन केले.