संपादक रामेश्वरजी धुमाळ लातूर भूषण पुरस्काराने सन्मानित
लातूर :- (एल.पी.उगीले) अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात नावीन्यपूर्ण व उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना लातूर शहरातील प्रणवश्री मंगल कार्यालय येथे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व्यंकटराव बेद्रे, लातूरचे माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश पवार हे उपस्थित होते. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा फिक्स ह्यूमन राइट्स मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर (बाबा) यांची उपस्थिती होती.
या पुरस्कार सोहळ्यामध्ये गेल्या वीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रासह पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत असून उल्लेखनीय कार्य करत समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळप्रसंगी मीडियातून प्रश्नाची बाजू मांडून धरणारे, प्रसंगी पुढारात घेऊन आंदोलन करून शासन दरबारी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम प्रयत्नशील असलेले झुंजार पत्रकार रामेश्वरजी धुमाळ यांचा लातूर भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी लातूर शहरातील विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांसह व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये ग्रीन लातूर वृक्ष टीम, वीर योद्धा संघटना, लातूरचा राजा गणपती, अकाल सेना, वृक्ष प्रतिष्ठान लातूर, आरंभ प्रतिष्ठान, रुग्णहक्क संघर्ष समिती, नाट्य कलावंत समिती आदीं ग्रुपला त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यासोबतच विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींनाही पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यामध्ये डॉ. ईश्वर बाहेती, सामाजिक क्षेत्रासह दैनिक समीक्षा माध्यम समूहाच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षापासून समाजाचे प्रश्न लावून धरणारे व समाजाला न्याय देण्याचा अहोरात्र प्रयत्न करणारे संपादक रामेश्वरजी धुमाळ, लातूरच्या राजा गणपती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शामभाऊ जाधव, विधीज्ञ गोपाळ बुरबुरे, साहित्यिक संजय जमदाडे, रामभाऊ पवार, विष्णू भुतडा, हरिश्चंद्र सुडे, संतोष बिराजदार, अशोक भोसले, मनसे जिल्हाध्यक्ष प्रीती भगत, धाडस संघटनेच्या जिल्हाध्यक्ष प्रीती कोळी, भारती सूर्यवंशी, डॉ. व्ही व्ही कुलकर्णी, वैशाली लोंढे, योगिता ठाकूर, अजयसिंग राठोड, मीनाक्षी दोरवे, आकाश आडगळे इत्यादी मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी
अमोल नानजकर, विधीज्ञ राणीताई स्वामी, आकाश गडगळे,नेताजी जाधव,अजयसिंग राठोड,महेश पाटील, विकास गुरमे,वैभव कुमार मिश्रा,तुषार रेड्डी, विशाल सावंत, सुवर्णा नाईक, मोक्षदा भंडार कवठेकर,रेखा खंदाडे, भारती सूर्यवंशी,मीनाक्षी दोरवे,दिनेश कांबळे,महेश माने रायवाडीकर,हर्षवर्धन अक्कणगीरे,प्रा.प्रदीप भारती,अदीत्य कासले, गोपाळ माळी,रवि गायकवाड़,चंद्रकांत शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले.