जल साक्षरता रॅलीचे देवणी तालुक्यात जंगी स्वागत
देवणी (प्रतिनिधी) : आपल्या जिल्ह्यातील ७५ टक्के पेक्षा अधिक लोकसंख्येचा आधार असलेली शेती संकटात आली आहे. शिवाय आपण २०१५ च्या दुष्काळात भीषण पाणी टंचाईला सामोरे गेलो आहे. आपल्या जिल्ह्यातील मांजरा, तेरणा, लेंडी आणि मन्याड या चारही नद्यांच्या खोऱ्यात पाण्याचे दुर्भिक्ष आहे. जिल्ह्यातील नष्ट होत असलेले वनीकरण यामुळेच पावसाचे प्रमाण घटत चालले आहेत. त्यामुळे शेतीची परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. या परिस्थितीमुळे तरुण वर्ग झपाट्याने मोठ्या शहराकडे स्थलांतर करत आहे. यावर शाश्वत उपाय शोधण्यासाठी १२ ऑगस्ट पासून जनजागर मंचच्या माध्यमातून माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यानी जन जागर संवाद या कार्यक्रमाचे आयोजन सुरू केले असून दिवसातून २१ सप्टेंबर रोजी जल साक्षरता रॅलीचे देवणी तालुक्यात जंगी स्वागत करण्यात आले.यात विविध क्षेत्रातील तज्ञाशी प्रदीर्घ चर्चा करून जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा तयार केला असून राज्य सरकारने पश्चिम वाहिन्या नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे १६८ टीएमसी पाणी गोदावरी मार्गे जायकवाडी प्रकल्पात मराठवाड्याला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पण सध्याच्या नियोजनात मांजरा, तेरणा, लेंडी आणि मन्याड खोऱ्यामध्ये या पाण्याला आणण्याची तरतूद नाही. महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या पाण्यात आपला समसमान वाट्याचा अधिकार आहे. मात्र सध्या असे होत नाही. यासाठीच आपला संघर्ष असल्याचे निलंगेकर यानी सांगीतले. जिथून पाणी आणायचे आहे, त्या मुळ स्त्रोतातच पाण्याच्या समान वाटण्या करून लातूर जिल्ह्याला स्वतंत्र मार्गाने पाणी मिळवून देण्यासाठी संघर्ष सूरू केल्याचे ते बोलत होते.पुढे बोलताना आमदार निलंगेकर म्हणाले आपल्या कोरडवाहू शेतकऱ्यांना आधार म्हणून पाझर तलाव झाले, पण जिल्ह्यातील भूगर्दीय रचनेमुळे या तलावातील अंदाचे ६५ टक्के पाण्याचा नाश होतो. हा नाश रोखण्यासाठी पाझर तलावाच्या खालील भूगर्भाचे नवीन तंत्रज्ञानाने सर्वेक्षण करून हे पाणी जमिनीत मुरण्यासाठी योजना राबविणे,यासाठी शासन दरबारी संघटित होऊन आवाज उठवणे, जेणेकरून भूजलसाठा वाढून शेतकऱ्यांना बारा महिने शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होईल व पिण्याच्या पाणी टंचाईवर मात करता येईल. आपल्या धरणाची साठवण क्षमता गाळामुळे दरवर्षी कमी होते.व बाष्पीभवनामुळे अर्धे पाणी उडून जाते. यासारख्या अनेक समस्या वर मात करण्यासाठी गाळ काढून धरणाची क्षमता वाढवणे, पाण्याचा थेंब ना थेंब जमिनीत मुरवणे, बाष्पीभवन घटविण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरणे अशा उपयोजना शासनामार्फत करणे गरजेचे असून आपल्या हक्काचे पाणी आपल्या शेतीला व उद्योगाला मिळावे या उद्देशाने व आपल्या पुढील पिढ्यांसाठीची पाणी टंचाई याचा विचार करून जनसागर मंचच्या माध्यमातून जनजागर संवाद रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याचे ते बोलत होते. त्या निमित्ताने देवणी तालुक्यात आलेल्या जनजागर संवाद रॅलीचे देवणी तालुक्यात जवळगा,वलांडी व देवणी येथे जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी तालुक्यातील बहूतांश सोसायट्या, ग्रामपंचायती,गणेश मंडळ यानी या रॅलीत जाहीर पाठींबा असल्याचे लेखी दीली आहे.या वेळी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, अरविंदभैया पाटील, भगवानराव पाटील तळेगावकर, प्रेरणा होनराव, प्रशांत पाटील जवळगेकर, काशिनाथ गरिबे, मनोहर पटणे, नागेशअण्णा जिवणे,शंकर पाटील,यशंवतराव पाटील,अनिल इंगोले,अनिल कांबळे,सदाशिवराव पाटील,किशोर निडवंचे,रामलिंग शिरे,अनिल रोटे,उमांकात बर्गे, नरसिंग सुर्यवंशी,राजकुमार बिरादार,अटल धनुरे,बालाजी बनसोडे,ओम धनुरे,संजय गरड,सलिम उंटवाले,माधव बालुरे,बालाजी सुर्यवंशी,प्रभु काकनाळे,देवणी तालुक्यातील भाजपाचे जेष्ठ नेते, पुढारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या रॅलीत हाजारोच्या संखेने दुचाकीस्वार सहभागी झाले होते.