उदगीर रोटरी तर्फे सायबर क्राइम जनजागृती संपन्न
उदगीर (प्रतिनिधी) रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल, लातूर पोलीस व शिवाजी महाविद्यालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर क्राइम संदर्भात जनजागृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमास मुख्य व्याखाते म्हणून पुणे येथील एक्सलेन्ट सायबर फॉरेनसिक्स अँड वेब सेक्यूरिटीजचे संस्थापक व संचालक मुकेश भांदरगे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमेश आंबरखाने होते. कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद नवले, शहर पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम, रोटरीच्या अध्यक्षा मंगला विश्वनाथे, सचिव सरस्वती चौधरी व प्रोजेक्ट चेअरमन सुयश बिरादार, डॉ. विष्णु पवार हे मंचावर उपस्थित होते. यावेळी समाजात तंत्रज्ञानामुळे खूप चांगली व गतिमान प्रगती होत आहे, ज्यामुळे जग हे अगदी जवळ येऊन बसले आहे, पण त्यासोबतच त्याचे अनेक दुष्परिणाम ही भोगावे लागत आहेत. तंत्रज्ञानामुळे अनेक गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे, आर्थिक फसवणूकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत, या आभासी जगात कोण खरे व कोण खोटे ? हे ठरवणे कठीण आहे. त्यासोबतच आभासी तंत्रज्ञानामुळे व फेसबूक, इंस्टाग्राम, व्हॉटसअप यांच्या भरमसाठ वापरामुळे अनेक मुलींचे व महिलांचे वैयक्तिक आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. असे त्यावेळी मुकेश भांदरगे यांनी सांगितले, व अश्या प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृतीपासून कसा बचाव करावा? या संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत, प्राचार्य डॉ. अरविंद नवले, पो. नि. परमेश्वर कदम व रमेश अंबरखाने यांनीही २१ व्या शतकात तंत्रज्ञान हे दुधारी तलवार असल्याचे सांगून त्याचा वापर सावधानपूर्वक करणे गरजेचे असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल जैन यांनी केले. सुत्रसंचालन विशाल तोंडचिरकर यांनी केले. आभार मंगला विश्वनाथे यांनी मानले. कार्यक्रमास रोटरीचे संतोष फुलारी, प्रशांत मांगुळकर, रविंद्र हसरगुंडे, डॉ. सुधीर जाधव, महानंदा सोनटक्के, चंद्रकांत ममदापुरे, अॅड. विक्रम संकाये, अभिजीत पटवारी, डॉ. अश्विनी बिरादार, विद्या पांढरे, अनिल मुळे आदींसह पोलीस अधिकारी, कर्मचारी, शिवाजी महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.