आत्मविश्वासाने मनुष्य घडतो- प्रा.डॉ.दीपक चिद्दरवार

आत्मविश्वासाने मनुष्य घडतो- प्रा.डॉ.दीपक चिद्दरवार

उदगीर- (एल.पी.उगीले) आत्मविश्वास, अथक परिश्रम आणि अचूक निर्णय ही माझ्या यशाची गुरुकिल्ली आहे, असे मत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.दीपक चिद्दरवार यांनी व्यक्त केले. येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या वसतीगृहातील गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रबोधनात्मक व्याख्यानमालेत ते बोलत होते. आपल्या आयुष्याची गुरुकिल्ली “मी असा घडलो” या विषयावर ते बोलताना म्हणाले, आत्मविश्वास, अथकपरिश्रम आणि अचूक निर्णय ही माझ्या यशाची गुरुकिल्ली आहे. आयुष्यात अनेक अनुभव घेत गेलो. अपयश आले तरी न खचता यशाच्या आशेनी वाट चालत गेलो, पडलो, परंतु रडलो नाही. घडलो. आयुष्याच्या धडपडण्याची गुरुकिल्ली सहजपणे यांनी उलगडून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव ॲड.एस.टी. पाटील हे होते. समारोपात ते म्हणाले की, सुप्त गुणांचा अविष्कार करणारं व्यासपीठ म्हणजे महाविद्यालय, उदयगिरी महाविद्यालयाने मला घडविले. मला आकार उदयगिरीने दिला, आयुष्यात शिल्पकार चांगले लाभलेत म्हणून मी घडलो. विद्यापीठाच्या परीक्षेत मी जसा सहजतेने पास झालो, तसा जीवनाची परीक्षा तितक्याच सहजतेने पास झालो. आई-वडील व गुरुजन यांच्या संस्कारामुळे मी घडलो. माझ्या आयुष्याचा आणि माझा यशाचा मळा फुलला. आई ही पहिला गुरु, वडील हे दुसरे गुरु, तिसरा गुरु ज्ञान आणि मित्र हा चौथा गुरु या चार गुरुमुळे आपण घडलो. असे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुस्मिता यादव बोरकर यांनी केले तर आभार जाधव सचिन यांनी मानले. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.के.मस्के , प्रा.डॉ.एम.बी.स्वामी, मुलांचे वस्तीगृहप्रमुख प्रा.डॉ.एस.एन.घोंगडे, प्रा.ए.के.वळवी, मुलींचे वस्तीगृह प्रमुख श्रीमती स्वामी, राजू बोनवळे हे उपस्थित होते.

About The Author