महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयास मैदानी स्पर्धेचे “सर्वसाधारण विजेतेपद”

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयास मैदानी स्पर्धेचे "सर्वसाधारण विजेतेपद"

उदगीर (प्रतिनिधी): स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत स्वामी विवेकानंद महाविद्यालय, शिरूर ताजबंद येथे आंतर महाविद्यालयीन ब- विभाग मैदानी स्पर्धा (पुरुष व महिला ) संपन्न झाल्या. या स्पर्धेत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या खेळाडूंनी सलग सहाव्या वर्षी सर्वसाधारण विजेतेपद -पुरुष व महिला दोन्ही गटात पटकाविले आहे. याचबरोबर या स्पर्धेत सुवर्ण पदक – 9, रौप्य पदक- 14, कांस्य पदक- 10 असे एकूण 33 पदके पटकावले आहेत.
विजेते महिला खेळाडू
तनिषा केंद्रे- 20 कि. मी. चालणे- प्रथम,
आरती जाधव- 200 मीटर धावणे- द्वितीय,
स्नेहा बुरापल्ले-1500 मीटर धावणे- प्रथम,
वैशाली राठोड- 200 मीटर धावणे-तृतीय,
मंगल काळे -भालाफेक -प्रथम,
थाळीफेक -द्वितीय,4 X 400 मीटर रिले संघ- प्रथम,4 X 100 मीटर रिले संघ- तृतीय
विजेत्या संघामध्ये आरती जाधव, वैशाली राठोड, लीना कोमटे, प्रियंका बाविस्कर, स्नेहा बुरापल्ले, तनिषा केंद्रे, सुप्रिया जगताप या खेळाडूंचा समावेश होता.
विजेते पुरुष खेळाडू
गणेश सुरवसे- 10000 मीटर धावणे- प्रथम,
5000 मीटर धावणे- तृतीय,
हंसराज ढगे- 1500 मीटर धावणे- द्वितीय,
पिराजी गित्ते- 400 मीटर धावणे- द्वितीय,
800 मीटर धावणे- द्वितीय,वसीम पठाण- 400 मीटर धावणे- तृतीय,मुकेश मुंडे- थाळीफेक- द्वितीय,भालाफेक- तृतीय,
हातोडा फेक- तृतीय,किशोर मसलगे -लांब उडी – द्वितीय,अभिषेक रेकूडवार- हातोडा फेक- प्रथम,4 X 400 मीटर रिले संघ- द्वितीय विजेत्या संचामध्ये हंसराज ढगे, गणेश सुरवसे, पिराजी गित्ते, वसीम पठाण, शुभम राठोड या खेळाडूंचा समावेश होता. खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा.सतिश मुंढे, प्रा.रोहन ऐनाडले यांनी मार्गदर्शन केले. त्याबद्दल सर्व विजेत्या खेळाडूंचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, उपाध्यक्ष डॉ.रेखा रेड्डी आणि अ‍ॅड.प्रकाश तोंडारे, सचिव रामचंद्र तिरुके, सहसचिव अ‍ॅड.एस.टी.पाटील चिघळीकर आणि डॉ.रामप्रसाद लखोटिया, कोषाध्यक्ष भालचंद्र चाकूरकर तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ.आर.के.मस्के, उपप्राचार्य डॉ.एस.जी.पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

About The Author