कृषि महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा येथे “स्वच्छता ही सेवा” अभियान संपन्न

कृषि महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा येथे "स्वच्छता ही सेवा" अभियान संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ , परभणी संलग्नित उदगीर येथील कृषि महाविद्यालय , डोंगरशेळकी तांडा येथील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवसानिमीत्या “स्वच्छता ही सेवा” हे अभियान देशभरात विविध उपक्रमाच्या माध्यातून राबवण्यात येत आहे. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमांतर्गत महाविद्यालय परीसर व दत्तक गाव डोंगरशेळकी तांडा येथे रा.सो.यो. स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी अभियानाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवीले. कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य ङॉ.अंगदराव सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ. आशोकराव पाटील व रा.सो.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. आर. खंडागळे याच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाचे नियोजन व आयोजन करण्यात आले होते. या मध्ये सर्वांनी स्वच्छता प्रतिज्ञा घेतली व गावातील केरकचरा, प्लास्टीक पिशव्या, बॉटल ई. कचरा एकत्रीत गोळाकरून पालस्टीक निर्मूलन केले. गावातील रस्ता, शाळा, महाविद्यालय परीसर स्वच्छ करण्यात आला. रस्त्याकडेची झाङे , गावातील झाङे, महाविद्यालय परीसरातील झाडे यांना आळेकरून पाणी देण्यात आले. या अभियानाअंतर्गत २ ऑक्टोबर पर्यंत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. “स्वच्छता ही सेवा” अभियानाच्या अंमलबजावणीसाठी डॉ. एस. एल. खटके , डॉ. वसीम शेख, प्रा .एम. टी. लोंढे, प्रा . एन. बी. राठोड, ङॉ.एस .एन वानोळे तसेच महाविद्यालयातील समस्त प्राध्यापक व प्राध्यापीका, प्रक्षेत्रावरील व कार्यालयीन कर्मचारीवर्ग, रा.सो.यो.स्वयंसेवक, विद्यार्थी- विद्यार्थिनी यांनी बहुमोल योगदान दिले.

About The Author