राष्ट्रीय सेवा योजनेतून ‘माणूस’ घडतो – डॉ. सादिक अली शेख

राष्ट्रीय सेवा योजनेतून 'माणूस' घडतो - डॉ. सादिक अली शेख

अहमदपूर (गोविंद काळे) : राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणारी कार्यशाळा आहे ; त्यातून राष्ट्रीय, सामाजिक जाणीव असलेला ‘माणूस’ घडतो, असे स्पष्ट प्रतिपादन हाडोळती येथील कर्मयोगी तुळशीराम पवार महाविद्यालय महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी जिल्हा समन्वयक डॉ. सादिक अली शेख यांनी केले.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या नवप्रवेशित विद्यार्थी कार्यशाळा या कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील हे होते. तर ; विचारमंचावर डॉ. सादिक अली शेख, एन.एस.एस. चे कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. सतीश ससाणे,एन.एस.एस. विद्यार्थी प्रतिनिधी कु. वैष्णवी मुंढे आदींची प्रमुख उपस्थिती होते. पुढे बोलतांना डॉ. सादिक अली शेख म्हणाले की, भारतीय संस्कृतीचा अंगीकार करून आई-वडील, गुरुजन आदींचा आदर करणे आणि सविनय पद्धतीने जीवन जगणे हेच खरे युवकाचे भूषण आहे, असेही ते म्हणाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते एन. एस. एस. च्या नव प्रवेशित विद्यार्थ्यांना डायरी व बॅचेसचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारंभात प्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, जीवनात सुसूत्रता आणण्याचे कार्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून होते. राष्ट्राची सेवा करण्याची भाग्य प्रत्येकालाच लाभत नाही ; ती संधी राष्ट्रीय सेवा योजनेतूनच मिळते आणि त्यातूनच व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले तर ; सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख बब्रुवान मोरे यांनी केले व आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. सतीश ससाणे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author