सिद्धी शुगर साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा

सिद्धी शुगर साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील उजना स्थित सिध्दी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि. महेशनगर या कारखान्याचा सन २०२३-२४ च्या १२ व्या गाळप हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ २६ सप्टेंबर रोजी सकाळी कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश बाळासाहेब जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रगतशील शेतकरी श्री. व सौ. बालाजी निवृत्ती गुंडरे व श्री. व सौ. प्रशांत रमाकांत पाटील, पी.जी. होनराव (व्हाईस प्रेसिडेंट), एस. आर. पिसाळ (जनरल मॅनेजर) व सर्व खातेप्रमुख यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी कारखान्याचे व्यवस्थापकिय संचालक अविनाश जाधव बोलताना म्हणाले की, निसर्गाने अवकृपा केली असली तरी, जेथे शक्य आहे तेथे शेतकरी सभासदांनी व बिगर सभासदांनी ऊस क्षेत्र वाढविण्यावर भर द्यावा व आहे त्या क्षेत्रावर एकरी उत्पादन वाढवावे, असे अवाहन केले. तसेच कारखान्यातील कर्मचान्यांनी कर्तव्यावर असताना मोबाईलचा वापर करणे टाळावे, जेणेकरून अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी व आपापल्या विभागातील परिसर स्वच्छ कसा ठेवता येईल याची दक्षता घ्यावी, अशी सूचना केली. या प्रसंगी व्हाईस प्रेसिडेंट पी. जी. होनराव यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आजपर्यंत महाराष्ट्रात पावसाने दडी मारल्यामुळे उसाची अपेक्षित वाढ झाली नाही, त्याचा साखर उत्पादनावर परिणाम होणार आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी अपेक्षेपेक्षा कमी गाळप होणार आहे. परंतु सद्यस्थितीला गणरायाच्या आगमानाने पावसाचे पुनर्रागमन झाल्याने समाधान व्यक्त केले. यावेळी कारखान्याचे फॅक्ट्री मॅनेजर, बी. के. कावलगुडेकर, जनरल मॅनेजर (केन) पी.एल. मिटकर, चिफ फायनान्स ऑफिसर आनंद पाटील, चिफ अकाउंटंट एल. आर. पाटील, टेक्निकल डव्हायजर सोमवंशी, डे. चिफ इंजिनिअर डी. एस. ढगे, डे. चिफ इंजिनिअर मुलानी, ऊस विकास अधिकारी वाय. आर. टाळे, असि. ऊस पुरवठा अधिकारी येदले, डे. चिफ अकाउंटंट एल. आर. पाटील, टेक्निकल डव्हायजर सोमवंशी, डे. चिफ इंजिनिअर डी. एस. ढगे, डे. चिफ इंजिनिअर मुलानी, ऊस विकास अधिकारी वाय. आर. टाळे, असि. ऊस पुरवठा अधिकारी येदले, डे. चिफ केमिस्ट लकडे, परचेस ऑफिसर धनराज चव्हाण, गोडाऊन किपर कदम, हेड टाईम किपर टिळक, स्टोअर किपर स्वामी, गार्डन सुपरवायझर हरिभाऊ पांचाळ आदींसह कारखाना परिसरातील शेतकरी सभासद व ऊसउत्पादक शेतकरी उपस्थित होते. प्रास्ताविक व्हाईस प्रेसिडेंट पी. जी. होनराव यांनी सूत्रसंचालन दुग्ध संकलन अधिकारी कारखान्याचे जनरल मॅनेजर (केन) पी. एल. मिटकर यांनी मानले.

About The Author