नागझरी येथे नागनाथ गणेश मंडळातर्फे ९५ जणांची मोफत तपासणी
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील नागझरी येथील नागनाथ गणेश मंडळाच्यावतीने दि. २५ रोजी नागझरी व परिसरातील गर्भवती मातांची तपासणीसह सर्वरोग रक्त तपासणी करण्यात आली. यात ९५ जणांची रक्त तपासणी केल्याची माहिती उपसरपंच उद्धव ईप्पर यांनी दिली. अध्यक्षस्थानी सरपंच रामकिशन सूर्यवंशी होते. यावेळी उपसरपंच उध्दव इप्पर आपल्या प्रास्ताविकपर भाषणात बोलताना म्हणाले की, मागील पाच वर्षापासून गावात एक गाव, एक गणपती उत्सव अगदी थाटामाटात साजरा होतो. गावचे सुपुत्र आयपीएस (डीआयजी) मंचक इप्पर यांच्या मार्गदर्शनातून प्रत्येक वर्षी गणेशोत्सव कालावधीत समाजोपयोगी कार्यक्रम घेतले जातात. यावर्षीही आमच्या गणेश मंडळांनी सर्व रोग तपासणी शिबिर व गर्भवती मातेची तपासणी हा उपक्रम आयोजित केलेला आहे.रक्त तपासणीतून शुगर, सीबीसी, लिव्हर फंक्शन, किडनी फंक्शन, लिपिड प्रोफाइल, थायरॉईड व बीपी आदी तपासण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी चेअरमन अंकुश इप्पर, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बालाजी नागरगोजे, गणेश मंडळाचे अध्यक्ष तुकाराम इप्पर, अंकुश आलापुरे, नाथराव आलापुरे, सुशील इप्पर, शरद कासले, प्राथमिक आरोग्य केंद्र आंधोरीचे तनुप्रिया घोडके, सुचिता चोले, कासले, खोले, हर्षद कांबळे आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. सतीश इप्पर यांनी केले. आभार अंकुश इप्पर यांनी मानले.