प्राचार्य डॉ सोमनाथ रोडे यांना स्वामी रामानंद स्मृती सन्मान

प्राचार्य डॉ सोमनाथ रोडे यांना स्वामी रामानंद स्मृती सन्मान

उदगीर (एल.पी.उगीले) : मैत्र जीवांचे च्या वतीने प्रसिद्ध व्याख्याते व विचारवंत प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे यांना स्वामी रामानंद तीर्थ स्मृती सन्मान उदगीर येथे प्रदान करण्यात आला. प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. प्राचार्य रोडे हे श्रमर्षी बाबा आमटे यांचे मानसपुत्र म्हणून ओळखले जातात. स्वामी रामानंद तीर्थ,प्राचार्य नरहर कुरुंदकर श्रमर्षी बाबा आमटे यांच्या सहवासाने पुनित झालेल्या डॉ. रोडे यांनी मराठवाडा जनता विकास परिषद, महाराष्ट्र इतिहास परिषद , बहिःशाल शिक्षण मंडळ, समाजभारती आदी माध्यमातून सातत्याने कार्यरत राहणाऱ्या डॉ. रोडे यांची आजही सामाजिक कार्यासाठी भ्रमंती सुरुच असते .

धन्वंतरी आयुर्वेद महाविघालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विश्वनाथ मुडपे यांच्या हस्ते प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. ” स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावाने मिळणारा हा सन्मान मौल्यवान आहे “असे उद्गार डॉ. रोडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले . प्राचार्य डॉ दत्तात्रय पाटील यांनी अध्यक्षीय समारोप केला . डॉ बनसोडे यांनी सुत्रसंचालन तर डॉ एस. आर. श्रीगीरे यांनी आभार मानले. सोमनाथ रोडे ना हा सन्मान प्रदान करण्यात आल्याबद्दल डॉ.अनिल भिकाने, प्राचार्य डॉ.बी.टी.लहाने, देविदास नादरगे, उद्योजक रमेश आण्णा अंबरखाने, डॉ.राम‌प्रसाद लखोटिया, रमाकांत बनशेळकीकर, प्रा.चंद्रशेखर मलकलपट्टे , विठ्ठलराव मरलापल्ले इ.नी. अभिनंदन केले.

About The Author