कृषि महाविद्यालय येथे शौर्यगाथा मुक्ती संग्रामाची व्याख्यानमाला संपन्न

कृषि महाविद्यालय येथे शौर्यगाथा मुक्ती संग्रामाची व्याख्यानमाला संपन्न

उदगीर (प्रतिनिधी) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ , परभणी अंतर्गत नंदिग्राम कृषी एवम ग्रामविकास संस्था , सुगाव संचलित कृषि महाविद्यालय डोंगरशेळकी ( तांडा ) उदगीर व धन्वंतरी आयुर्वेद मेडिकल कॉलेज,उदगरी यांच्या संयुक्त विद्यमाने हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी दिवसानिमित्त शौर्यगाथा मुक्ती संग्रामाची व्याख्यानमाला व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांसाठी प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम आयोजन कृषि महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले.

प्रथमत: सरदार वल्लभाई पटेल, स्वामी रामानंद तीर्थ व वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपप्राचार्य डॉ.अशोकराव पाटील यांनी व्याख्यानमालेची प्रस्ताविक केले. अध्यक्षस्थानी गंगाधरजीराव दापकेकर, जेष्ठ विचारवंत व व्याख्याते ङॉ.सोमनाथ रोडे,डॉ. अंगदरावजी सूर्यवंशी, धनंजय गुडसुरकर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक विश्वनाथ मूडपे व राजाराम चव्हाण ईत्यादी मान्यार व्यासपीठावर उपस्थित होते.

हैदराबादचा स्वातंत्र्यलढा हा केवळ हा राजा बदलाचा नव्हता,तर तो सरंजामशाही विरुद्ध होता. सामान्य जनतेने मोठ्या प्रमाणात घेतलेला सहभाग अत्यंत महत्त्वाचा होता. असे प्राचार्य ङॉ. रोडे पुढे बोलताना म्हणाले. स्वामी रामानंद तीर्थ यांचे सर्व समावेशक नेतृत्वाखाली हा लढा जिंकता आला, व भारतीय स्वातंत्र्याला पूर्णत्व आल्याचे रोडे म्हणाले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमांतर्गत गतवर्षी विद्यार्थ्यांनी या उपक्रमांतर्गत विविध सांस्कृतिक, समाजीक उपक्रम राबवून उत्कृष्ट कामगिरी केली,त्या बद्दल प्रमाणपत्र सदरील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. . गंगाधररावजी दापकेकर यांनी अध्यक्षीय समारोप केला.
या व्याख्यानमालेसाठी उपस्थित सचिनकुमार टाळे, चरणदास गाडेकर, गुरुराज वरनाळे व रविकांत पाटील तसेच कृषि महाविद्यालयातील डी डी ओ डॉ. आनंदरावजी दापकेकर, ङॉ.एस. बी. पवार, ङॉ.वसीम शेख, ङॉ. ङी. जी.पानपट्टे, ङॉ.एस. एन. वानोळे, प्रा. एस. टी. ङफङे, ङॉ दिपाली कोकाटे, प्रा. स्नेहा मुन,तसेच महाविद्यालयातील समस्त प्राध्यापक व प्राध्यापीका, प्रक्षेत्रावरील व कार्यालयीन कर्मचारीवर्ग, महाविद्यालयातील विद्यार्थी, रा.सो.यो.स्वयंसेवक विद्यार्थी- विद्यार्थिनी ईत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन खंडागळे कार्यक्रम अधिकारी, यांनी उपस्थित त्यांचे आभार मानून कार्यक्रमाचे सांगता झाली.

About The Author