भरत चामले यांनी खरेदी विक्री संघाचे नावलौकिक केले – भगवानदादा पाटील तळेगावकर
उदगीर (एल.पी.उगीले) : स्व. रामचंद्र पाटील तळेगावकर सहकारी तालुका खरेदी विक्री सांघाच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून खरेदी विक्री संघाचे चेअरमन तथा महाराष्ट्र राज्य कापूस फेडरेशन महासंघाचे संचालक भरतभाऊ चामले यांनी उत्कृष्ट कार्य करून खरेदी विक्री संघाचे नावलौकिक वाढवले आहे. असे विचार लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा शिक्षण महर्षी भगवानदादा पाटील तळेगावकर यांनी व्यक्त केले. ते उदगीर येथील स्व. रामचंद्र पाटील तळेगावकर सहकारी खरेदी विक्री संघाच्या 49 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरतभाऊ चामले यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा खेळेमिळीच्या वातावरणात संपन्न झाली. याप्रसंगी उदगीर, जळकोट, चाकुर, देवणी व शिरूर अनंतपाळ या ठिकाणाहून आलेल्या सर्व उपस्थित सभासदांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला.या प्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन शंकरराव पाटील तळेगावकर, संचालक रामराव मामा बिरादार येनकीकर, व्यंकटराव पाटील अवलकोंडकर, किशनराव हरमुंजे, विठ्ठलराव मुळे, बाबासाहेब काळे पाटील, प्रभूराव पाटील, वसंतराव सोनकांबळे, मारुतीराव पवार, मालनबाई कोनाळे, रूक्मीनबाई बिरादार यांच्यासह ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक तुकाराम चामले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना भगवानराव पाटील तळेगावकर म्हणाले की, उदगीर तालुका खरेदी विक्री संघाचे सध्याचे कार्य महाराष्ट्रात उल्लेखनीय आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, या दृष्टीने त्यांच्या मालाला योग्य किंमत देणे, हमीभावाप्रमाणे नोंदणी करून घेणे, तसेच सॅम्पल, मातेरे या नावाने शेतकऱ्याची होणारी लूट थांबउन मातेरे शेतकऱ्याला परत देणे. यासारखे अनेक उल्लेखनीय कार्य भरतभाऊ चामले यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले आहेत. त्यामुळे स्व. रामचंद्र पाटील तळेगावकर खरेदी विक्री संघाचे नाव आज सर्वसामान्य शेतकरी मोठ्या अभिमानाने घेतात. याचे श्रेय विद्यमान संचालक मंडळाला जाते, असेही सांगितले. या बैठकीचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन खरेदी विक्री संघाचे प्रभारी व्यवस्थापक मारोतीराव बिरादार यांनी केले.