हेर व परिसरात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी
हेर (प्रतिनिधी) : हेर ता.उदगीर येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी सरपंच सारिका अविनाश सूर्यवंशी यांच्या हस्ते महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री
यांच्या प्रतिमेचे पूजन झाले .यावेळी ग्रामविकास अधिकारी बाबुराव मुसळे,
लिपिक वसुली कारकून विलास कांबळे,उपसरपंच तुळशीराम बेंबडे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मिटकरी, वर्षाराणी मंगेशकुमार हेरकर,, किशन ढगे, अविनाश सूर्यवंशी, व्यंकट ढगे, चेअरमन संगमेश्वर मिटकरी, गट सचिव शिवाजी बस्तापुरे, नारायण सुवर्णकार, आदर्श शेतकरी दूध संघाचे माजी संचालक बाबासाहेब पाटील, भारतीय जनता पार्टीचे नेते शेषराव ढगे, सुधाकर कुलकर्णी, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक ज्योतीराम ढगे, संतोष गुरमे, अशोक मुसले, व्हाईस चेअरमन पुरुषोत्तम मुंडे, गोपाळ गुरडे, लक्ष्मण जाधव, सूर्यकांत तवंडे ,काशिनाथ तवंडे, लक्ष्मण गुराळे,
व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. तसेच ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक आबासाहेब नवाडे यांच्या हस्ते महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुन्ना सुर्यकर, सहशिक्षिका श्यामला पाटील, रंजना गंगापुरे, संजीवनी भुसणीकर उपस्थित होत्या.तसेच ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयात अध्यक्ष मंगेश कुमार हेरकर यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
शंभूउमरगा ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच लिंगेश्वर स्वामी यांच्या हस्ते महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वसंत पाटील, ग्रामविकास अधिकारी सितापे
उपस्थित होते.
भाकसखेडा ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अर्चना खेडकर यांच्या हस्ते महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.. यावेळी ग्रामविकास अधिकारी नरेंद्र पांचाळ, उपसरपंच अरविंद मोरेे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
.ग्रामपंचायत कार्यालय करडखेल येथे सरपंच सुवर्णा मोमले यांच्या हस्ते महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी उपसरपंच सुनंदा मुळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामविकास अधिकारी पी.एन.कानुरे उपस्थित होते. लोहारा ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच महादेवी कांबळे यांच्या हस्ते महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी उपसरपंच शंकर भातमोडे, ग्रामपंचायत सदस्य मोहन पाटील उपस्थित होते..