आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेतील यशाचे गमक शालेय जीवनातील शिस्त व संस्कार – आयर्नमॕन संदीप गुरमे
उदगीर (एल.पी.उगीले) आंतरराष्ट्रीय पातळीवरील ट्रायथलाँन ह्या मानसिक, शारीरिक क्षमतेचा कस पाहणाऱ्या स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी यशस्वी होण्यामागील गमक म्हणजे शालेय जीवनात मिळालेल्या शिस्तीचे धडे होय .शाळेच्या सर्व मैदानी स्पर्धेत व एनसीसीत अग्रेसर राहिल्याने अंगी शिस्त ,शुद्ध आचरण, जिद्द व चिकाटी निर्माण झाली .शिक्षकांनी अंगी बानवलेल्या शिस्तीमुळेच आज आंतरराष्ट्रीय पातळीवर आयर्न मँन बनू शकलो , असे प्रतिपादन लालबहादुर शास्त्री संकूलाचे माजी विद्यार्थी ,छत्रपती संभाजीनगर येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक ,आयर्नमॅन संदीप गुरमे यांनी व्यक्त केले. उदगीर येथील लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या माजी विद्यार्थी सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पर्यवेक्षक रमाकांत क्षीरसागर तर प्रमुख अतिथीस्थानी उदगीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीपजी भागवत ,भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे केंद्रीय सदस्य तथा संकुलाचे कार्यवाह शंकरराव लासूणे ,माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष सतनप्पा हुरदळे, मुख्याध्यापक अंबादास गायकवाड उपस्थित होते .या शैक्षणिक वर्षात विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांच्या विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक आयर्न मॅन संदीपजी गुरमे व त्यांच्या पत्नी अॕड.रजनी सुडे, नांदेड येथील पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ.राजकुमार पडिले , हाफ आयर्नमॅन विवेक होळसंबरे, नवनिर्वाचित पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय आवले , हाफ आयर्नमॅन गोविंद रंगवाळ इत्यादी माजी विद्यार्थ्यांचा सन्मान विद्यालयाच्या वतीने करण्यात आला.
याप्रसंगी सर्व माजी विद्यार्थ्यांनी सत्काराला उत्तर देताना, आपल्या शालेय जीवनातील आठवणी सांगत विद्यालयांमध्ये मिळालेल्या संस्कारामुळेच आयुष्य कसे घडले, याची उदाहरणे सांगत शाळेच्या आठवणींना उजाळा दिला .डॉ. राजकुमार पडिले यांनी शाळेने अभ्यासाची शिस्त लावली त्याचबरोबर वैयक्तिक आयुष्यालाही शिस्त लावल्याचे नमूद केले.
विवेक होळसंबरे यांनी आपल्या ग्रामीण जीवनाचा पीळ शाळेत आल्याने अभ्यासू बनत गेला आणि निवडलेल्या क्षेत्रात यशस्वी होत गेल्याचे नमूद केले.अॕड.रजनी गुरमे यांनी शिक्षकांच्या व शाळेच्या आठवणी सांगितल्या.
प्रमुख अतिथी पोलीस उपविभागीय अधिकारी दिलीपजी भागवत यांनी आयर्नमँन संदीपजी गुरमे यांनी मिळवलेले विश्वविक्रमी यश हे पोलीस खात्यासाठी अभिमानास्पद असल्याचे नमुद केले. अध्यक्षीय समारोपात रमाकांत क्षीरसागर यांनी गांधीजी व लालबहादुर शास्त्रीजींच्या जीवनातील प्रेरक प्रसंग सांगत माजी विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल अभिनंदन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निता मोरे,प्रास्ताविक लक्ष्मी चव्हाण ,स्वागत परिचय अनिता मुळखेडे,वैयक्तिक गीत प्रिती शेंडे तर ऋणनिर्देश पर्यवेक्षक लालासाहेब गुळभिले यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी, पर्यवेक्षक कृष्णा मारावार ,माधव मठवाले, अभ्यासपूरक मंडळ प्रमुख बालाजी पडलवार ,मीनाक्षी कस्तुरे यांनी परिश्रम घेतले.