बेनीनाथ शेतकरी उत्पादक कंपनीची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यातील प्रख्यात असलेली बेनीनाथ शेतकरी उत्पादक कंपनी मर्यादित लोहारा तालुका उदगीर, जिल्हा लातूर या राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) द्वारे स्थापित असलेल्या व पुणे येथील अफार्म संस्थेच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या या संस्थेची तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरण मध्ये कंपनीचे अध्यक्ष हंसराज मोमले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
राजेंद्र इंगळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक सुनील चव्हाण, कृषी सहाय्यक हनुमंत म्हेत्रे ,श्रीमती आम्रपाली ससाने, मधुकर मोरे, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक सुनील बिरादार, प्रकल्प समन्वयक अफार्मचे यशवंत गायकवाड, कंपनीचे सर्व संचालक मंडळ यामध्ये प्रामुख्याने अध्यक्ष हंसराज मोमले, उपाध्यक्ष श्रीमती विजया सावंत, संचालक रामचंद्र सावंत, आनंद कांबळे, सीमा साखरे, पद्माकर मागले, भास्कर जाधव, संचालिका अनुसया मोमले,पुणेचे लेखापाल ऋषिकेश मोमले आणि कंपनीचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरुवातीला कृषी पर्यवेक्षक सुनील चव्हाण यांनी तूर या पिकावर पडणाऱ्या रोगाच्या संदर्भात शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली. तसेच त्या संदर्भात उपाययोजना काय कराव्यात, याचेही योग्य मार्गदर्शन केले. आफार्म प्रकल्प समन्वयक यशवंत गायकवाड, कृषी सहाय्यक हनुमंत म्हेत्रे, राजेंद्र इंगळे यांनी याप्रसंगी आपले मनोगत आणि मार्गदर्शन केले. कंपनीचे अध्यक्ष हंसराज मोमले यांनी प्रास्ताविक भाषणांमधून कंपनीची झालेली प्रगती आणि सभासदांचा संपादित केलेला विश्वास यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कंपनीचे संचालक पद्माकर मोगले यांनी केले.