महापुरुषांचे पुतळे उजळवून मातृभूमी महाविद्यालयाची म. गांधीजींना आदरांजली
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील मातृभूमी महाविद्यालयच्या वतीने शहरातील महापुरुषांचे पुतळे व परिसराची स्वच्छता करत महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली . या स्वच्छता उपक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली . यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शुभम क्यातमवार, मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश उस्तुरे, स्वारातीम विद्यापीठाचे सहाय्यक उपकुलसचिव दिलीप पाटील , प्राचार्य मनोज गुरुडे, मनसे जिल्हाध्यक्ष संजय राठोड , सतीश पाटील ,सुधीर पाटील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा, बिभीषण मद्देवाड, प्रा. रणजीत मोरे, प्रा उस्ताद सय्यद ,प्रा मीरा पाटील , संतोष जोशी आदीची उपस्थित होती. डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची स्वच्छता प्रसंगी माजी आ. सुधाकर भालेराव व अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा स्वच्छता प्रसंगी तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी उपस्थिती लावत श्रमदान केले. यावेळी माजी आ. सुधाकर भालेराव , तहसीलदार रामेश्वर गोरे , भाजपचे माजी तालुका अध्यक्ष वसंत शिरसे, भाजप शहर अध्यक्ष मनोज पूदाले, मनसे जिल्हाअध्यक्ष संजय राठोड, श्रीराम प्रतिष्ठान अध्यक्ष सतीश पाटील, रा. स्व.संघाचे सुधीर पाटील, विश्व हिंदू परिषदचे अभिजित पाटील, संस्कार भरतीचे सावंन टंकसाळे, बीजेपी तालुका अध्यक्ष शिवशंकर धुप्पे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
मातृभूमी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागाच्या वतीने १०० स्वंयसेवकांनी श्रमदान करत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा बसवेश्वर, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉ. अण्णाभाऊ साठे, डाॅ.जाकीर हुसेन चौक, म. बसवेश्वर पुतळा रेल्वेस्टेशन रोड, कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी चौक आदी ठिकाणच्या पुतळ्यांची व परिसराची स्वच्छता केली. स्वच्छतेसाठी पाणी टँकरची व्यवस्था नगर परिषदेच्या वतीने करण्यात आली होती. या उपक्रमाचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.