सर्वसामान्य जनतेच्या कार्यासाठी तत्पर रहा-रामेश्वर गोरे तसीलदार

सर्वसामान्य जनतेच्या कार्यासाठी तत्पर रहा-रामेश्वर गोरे तसीलदार

उदगीर (एल.पी.उगीले)
लोहारा-महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग यांच्या वतीने हा महिना सेवा महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे.त्या अनुषंगाने सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व त्यांना महसूल विभाग, ग्राम विकास विभाग, कृषी विभाग यांच्याकडून लागणारे विविध प्रमाणपत्र तसेच विविध योजना याची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी, व त्याचा लाभ मिळावा. यासाठी लातूरच्या कर्तव्यदक्ष पहिल्या महिला जिल्हाधिकारी सौ.वर्षा ठाकूर-घुगे यांच्या आदेशानुसार व उदगीरचे अभ्यासू उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उदगीरचे धाडसी तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या नेतृत्वाखाली उदगीर तालुक्यातील महसूल विभागात तसेच महसूल मंडळ या ठिकाणी सेवा महिना मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मंडळ अधिकारी विभाग हेर अंतर्गत मौजे लोहारा तालुका उदगीर या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या उपस्थितीत महात्मा गांधीच्या प्रतिमाचे पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लोहारा गावच्या प्रथम नागरिक महिला सरपंच सौ.महादेवी गणपत कांबळे या होत्या,तर उद्घाटक रामेश्वर गोरे तहसीलदार उदगीर,प्रमुख पाहुणे म्हणून व्यंकटराव पाटील माजी सरपंच लोहारा, दयानंद सोनटक्के माजी उपसरपंच लोहारा हे होते.
या कार्यक्रमाचे आयोजक पंडित जाधव मंडळ अधिकारी हेर, शंकर भातमोडे उपसरपंच लोहारा, राहुल रक्षाळे महा सेवा केंद्र संचालक लोहारा, अंकुश वडगावे तलाठी लोहारा, गजेंद्र भोसले ग्रामविकास अधिकारी लोहारा व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी केले होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंडित जाधव यांनी केले. त्यानंतर बोलताना उदगीरचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून सर्व विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहचउन त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वसामान्य लोकांची सेवा करावी. व त्यासाठी सर्वांनी तत्पर राहावे, असे आवाहन केले. या कार्यक्रमात अपंग, दुर्धर आजार ग्रस्त ,विधवा ,65 वर्षावरील महिला, पुरुष ज्यांचा समावेश श्रावण बाळ योजनेत झालेला आहे, ती योजना त्यांना मंजूर झाल्याचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. तसेच जन्म मृत्यू दाखला, दारिद्र्य रेषेचे प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, नान क्रिमीलेअर प्रमाणपत्र ,उत्पन्नाचे प्रमाणपत्र ,जातीचे प्रमाणपत्र ,नवीन नोंद झालेले सातबारा फेरफार तसेच अनेक योजनेचे प्रमाणपत्र या ठिकाणी वितरण करण्यात आले. याची संख्या जवळपास५५० इतकी होती.
लोहारा गावातील युवक जो महा ईल सेवा केंद्र चालवनारा राहुल रक्षाळे यांनी तहसीलदार यांच्या शब्दाला मान देऊन लोहारा गावातील सर्वसामान्य जनतेसाठी लागणारे विविध प्रमाणपत्र तयार करून विना शुल्क वाटप केले, व भविष्यात वाटप करण्यात येतील असे राहुल रक्षाळे यांनी सांगितले. तसेच आधार केंद्र स्थापन करून पाच दिवसाच्या कॅम्पमध्ये गावातील व परिसरातील सर्व लोकांचे काम करीन, असे राहुल रक्षाळे यांनी सांगितले. यावेळी लोहारा येथे आजपर्यंत झालेल्या तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली कामाचा प्रस्ताविकात पंडित जाधव यांनी उल्लेख करून मंजूर झालेल्या आत्तापर्यंतच्या सर्व कामाची माहिती दिली. तसेच अतिक्रमण असलेले रस्ते, खुले केलेली माहिती सांगितली.
हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी उदगीर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनी प्रोत्साहन दिले असल्याचे
पंडित जाधव यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंडित जाधव मंडळ अधिकारी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य मोहन पाटील यांनी केले. शेवटी सर्वांचे आभार तलाठी अंकुश वडगाव यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल रक्षाळे, विजयकुमार हेळगे ,पुंडलिक जाधव, बालाजी कल्लूरे आमिम पठाण, मुकेश सोनटक्के, बालाजी कांबळे, प्रकाश होळकर यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास वीद्धवान रक्षाळे, दिलीप पाटील, विठ्ठल पाटील, महिपाल पाटील, भगवान भुसागरे, रमाकांत मोमले, बालाजी रक्षाळे, हनुमंत रक्षाळे, गंगाधर रसाळे, नर्सिंग कांबळे, राजकुमार सोनटक्के, आनंद पाटील, माधव बिरादार, ज्ञानोबा पाटील, साहेबराव होळकर, अशोक रक्षाळे, मनोहर देवंग्रे, बिरादार त्र्यंबक, भागवतदादा बिरादार, बबन धनबा ,सोमकांत होळकर, देविदास सोनटक्के, बालाजी मोगले, दिलीप जाधव, अशोक मोरे, प्रकाश हैबतपुरे, रक्षाळे दयानंद, सतीश आजणे, गणपत बिरादार, तानाजी सामनगावे, बब्रुवान बिरादार, ज्ञानोबा मोगले यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author