कृषि महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी
उदगीर (एल.पी.उगीले) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ , परभणी संलग्नित कृषि महाविद्यालय , डोंगरशेळकी तांडा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना विभाग व दिन विशेष समिती याच्या सहकार्याने “स्वच्छता पखवडा” अभियानांतर्गत डोंगरशेळकी तांडा येथे ग्राम स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, श्रमदान व ग्राम स्वच्छता रॅलीतून कचरा मुक्त भारताचा” संदेश देण्यात आला.
या प्रसंगी कृषि महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. एम. पाटील यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याची सविस्तर माहीती सांगितली. व विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध जीवन कसे जगावे ? याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. सचिन खंडागळे यांनी आपल्या मार्गदर्शनातून महात्मा गांधीजीनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचे जीवन समर्पण केले. तसेच नेतृत्व, सामाजिक न्याय व शांततेचा मार्गाचा अवलंब करून एक आदर्श समाजासमोर ठेवला, असे सांगितले. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक के. एम. गायकवाड, डॉ. सागर खटके, डॉ. किरण जाधव, डॉ. एस. बी. पवार, डॉ. प्रशांत राठोड, प्रा. एन बी राठोड यांच्यासह कृषि महाविद्यालयातील विद्यार्थी, समस्त प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारीवर्ग व रा.सो.यो.स्वयंसेवक, विद्यार्थी उपस्थित होते.