अतनूर व परिसर आता होणार अंधमुक्त मुक्तेश्वर पाटील यांचा निर्धार

अतनूर व परिसर आता होणार अंधमुक्त मुक्तेश्वर पाटील यांचा निर्धार

जळकोट (एल.पी.उगीले) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जळकोट शिवसेना तालुकाप्रमुख मुक्तेश्वर पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अतनूर ता.जळकोट येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात मंगळवारी नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. अत्यंत कमी वयामध्ये पक्षाने दिलेली एवढी मोठी जबाबदारी स्वीकारत या युवा नेतृत्वाने शिबिर घेण्याचं धाडस केलं. आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये ते यशस्वी झाल्याचं सिद्ध झालं. जवळपास ९५ दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींची नेत्र तपासणी करण्यात आली, त्यात एकूण १० रूग्ण हे मोतीबिंदू सदृश्य आढळून आले. त्या १० रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी उदगीर येथील उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले. गरजू रुग्णांना चष्म्याचे वाटप देखील यावेळी करण्यात आले. मुक्तेश्वर पाटील यांनी सामाजिक भावना जोपासत दृष्टिहीनांना दृष्टी देण्याचं पवित्र काम केल्यामुळे परिसरामध्ये त्यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे. अशा प्रकारचे शिबिरे वेळोवेळी आयोजित केली जावीत, अशी भावना लोकांमधून व्यक्त होत आहे. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी हे उपस्थित होते. तर उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाचे डॉ. प्रशांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील शिबिर संपन्न झाले. शिबिर समन्वयक पथक प्रशांत गायकवाड, सचिन नीलांकर, श्रीकांत सावंत यांनी विशेष परिक्षेम घेतले.

About The Author