शेतकऱ्यांनी रुमणे हातात घेऊन जाब विचारला पाहिजे – डॉ भिकाणे
अहमदपूर (गोविंद काळे) : सद्या कुठलाच राजकीय पक्ष हा सत्ताधारी वा विरोधक नसून ही फक्त राजकिय मिलीभगत आहे त्यासाठी आपल्या उत्पादनाला स्वामिनाथन आयोगाप्रमाणे बाजारभाव न देणाऱ्या लोकप्रतिनिधी ना रुमने हातात घेऊन जाब विचारला पाहिजे असे प्रतिपादन मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांनी मोफत खतवाटप कार्यक्रमात शेतकऱ्यांना बोलताना केले.स्वामिनाथन आयोग लागू करणे शासनास परवडणार नाही असे लेखी उत्तर सर्वोच्च न्यायालयात शासनाने दिले आहे मग यांना शेतकरी आत्महत्या परवडतात काय असाही प्रश्न त्यांनी शासनास विचारला.यावेळी मनवीसे जिल्हासंघटक डॉ यश भिकाणे, तालुकाउपाध्यक्ष उत्तम पाटील, चेअरमन संग्राम चामे,सुरेश कराड आदी उपस्थित होते.याप्रसंगी दहा अल्पभूधारक शेतकऱ्यांना खटपोते वाटप करण्यात आले. आत्तापर्यंत डॉ भिकाणे यांनी मानखेड,कोपरा,धानोरा, विळेगाव याठिकाणी 50 शेतकऱ्यांना खतवाटप केले आहे. चिखली येथील त्र्यंबक कराड, शरद चाटे, शंकर कराड, गोपाळ इजारे,फुलचंद तांदळे,राहुल कोपले, कालिदास कलगुरे, श्रीधर चाटे, पांडुरंग दहिफळे आदी शेतकऱ्यांना खतवाटप करण्यात आले.या कार्यक्रमासाठी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनसे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.