मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त फैज ए आम चॉरिटेबल ट्रस्टच्या वतीने भव्य वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न

मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त फैज ए आम चॉरिटेबल ट्रस्टच्या वतीने भव्य वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील फैज हे आम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा समारंभ सिटी प्लाझा अहमदपूर या ठिकाणी अत्यंत आकर्षक पद्धतीने संपन्न झाला या स्पर्धेमध्ये अहमदपूर व चाकूर तालुक्यातील उर्दू माध्यमाच्या एकंदरीत 56 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेमध्ये प्राथमिक स्तर आणि माध्यमिक स्तर असे दोन विभाग करण्यात आले होते. सकाळच्या सत्रात प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी सुंदर असे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अलहाज हाफिस मौलाना अब्दुल्ल लतिफ जागीरदार हे होते तर दुपारच्या सत्रामध्ये माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांनी भाषण स्पर्धेमध्ये भाग घेतला या दुपारच्या सत्रातील अध्यक्षीय स्थान मौलाना फजले करिम साहब यांच्याकडे होते प्राथमिक स्तरातून पहिले बक्षीस केजीएन उर्दू प्रायमरी स्कूल अहमदपूर च्या चाऊस आफिफा या चिमुकलीने दिवंगत अब्दुल हकीम अब्दुल करीम यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आलेले रुपये 21000 हे प्रथम बक्षीस पटकाविले सदरील बक्षीस त्यांचे चिरंजीव अब्दुल फहीम यांच्या वतीने देण्यात आले तर द्वितीय बक्षीस नूर उर्दू प्राथमिक शाळा अहमदपूरच्या शेख मुसीरा कलीम या विद्यार्थिनीने पटकाविले बक्षिसाचे स्वरूप 11000 हजार समृद्धी चिन्ह आणि प्रमाणपत्र असे असून सदरील बक्षीस फारुख खान यांच्या वतीने त्यांचे वडील मरहुम हुसेन खान यांच्या स्मरणार्थ देण्यात आले तर तिसरे बक्षीस हक्कानिया उर्दू प्राथमिक शाळा चाकूरच्या शेख रैय्यान इरफान याने पटकाविले सदर बक्षिसाची रक्कम रुपये सात हजार स्मृति चिन्ह व प्रमाणपत्र असून ही रक्कम सय्यद सादत शब्बीर साहेब यांच्या वतीने देण्यात आली तर याच गटातून उत्तेजनार्थ दोन बक्षीस ही प्रदान करण्यात आले त्याचप्रमाणे दुपारच्या सत्रातील माध्यमिक स्तरात पहिले बक्षीस उस्मानिया हायस्कूल अहमदपूरच्या चाऊस अफान गालिबसाब याने पटकावले या बक्षिसाची रक्कम एकवीस हजार रुपये समृद्धी चिन्ह आणि प्रमाणपत्र असून हे बक्षीस मरहूम शेख अब्दुल गणी साहब यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव शेख वाजीद भाई स यांच्या वतीने देण्यात आले. तर दुसरे बक्षीस ए एच रिझवी हायस्कूल हाडोळतीच्या निचलकर शिफा रियाज अहमद याने पटकाविली रूपये 11000 रोख स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे बक्षीसाचे स्वरूप असून अन्वर पटेल यांच्यावतीने देण्यात आले तर तिसरे बक्षीस अल फारुख उर्दू हायस्कूल नळेगावच्या शेख बुशरा महबूब याने पटकाविले सदरील बक्षीस रुपये 7000 स्मृतिचिन्ह चिन्ह प्रमाणपत्र असून हे बक्षीस मेहरून्नीसा जोजा शेख अब्दुल गणी यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव शेख मुजीब यांनी दिले सदरील कार्यक्रमास पंच म्हणून प्राथमिक स्तरासाठी हजरत अलहाज मौलाना मुफ्ती मोहम्मद अबरार उलहक, हजरत मौलाना मुफ्ती अब्दुल जब्बार साहब आणि हजरत मौलाना असदुला साहब तर माध्यमिक स्तरासाठी हजरत अलहाज मौलाना मुफ्ती मोहम्मद खालेद शाकीर साहब कासमी हजरत अलहाज मौलाना मुफ्ती डॉक्टर मोहम्मद आझम साहब कासमी आणि हजरत काजी मुफ्ती अब्दुल रजाक साहब मजाहेरी यांनी निपक्षपणे पंचांची भूमिका बजावून निकाल दिला. या कार्यक्रमास अहमदपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर सहाय्यक पोलीस निरीक्षक करीम पठाण मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष सत्यनारायण काळे, कार्यवाह द.मा.माने,कोषाध्यक्ष महेंद्र खंडागळे बीएड कॉलेज शिरूर चे प्राचार्य डॉक्टर निळकंठ पाटील , हरिदास तम्मेवार, डॉ वैभव रेड्डी,उस्मान फैसल कास्मी,डॉक्टर कैलास देशमुख विकास अधिकारी मोहीब कादरी सामाजिक कार्यकर्ते मोहसीन बायजीद,यासोबत अहमदपूरचे उपनगराध्यक्ष मुजी पटेल जागीरदार नसीब जागीदार, एजाज खतिब सर, त्याचप्रमाणे

कार्यक्रमाचे प्रास्ताविक हाफिज गालिब व मोहसीन बायजीद यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रियाज अहमद व काजी रियाजोद्दीन यांनी केले तर आभार हाफीज इर्शाद यांनी मानले.

About The Author