वायगाव पाटी येथे अवैध धंद्यांनी गाठला कळस, धाडी टाकताना पोलिसांना कशाचा आळस?

वायगाव पाटी येथे अवैध धंद्यांनी गाठला कळस, धाडी टाकताना पोलिसांना कशाचा आळस?

हंडरगुळी (विठ्ठल पाटील) : आयपीएस “सिंघम” पोलीस अधिकारी निकेतन कदम यांनी हाळी-हंडरगुळी ता.उदगीर येथे “न भुतो न भविष्यती” अशा प्रकारे ३ मोठ्या “रेड्स” केल्या होत्या.यामुळे मे महिना संपेपर्यंत या भागात अवैध धंदे करायची कुणी हिम्मत करत नव्हते. कारण त्या तीन धाडीत पकडलेल्या इसमांना सिंघम निकेतन कदम यांचा दणका-हाबाडा माहिती आहे. सिंघम ने कारवाई हाळीहंडरगुळीत केली होती.तरी त्यांचा दरारा ,धाक सर्वदुर पसरला म्हणुन या भागातील अवैध धंदे करणारे सगळे बिळात बसलते होते, अशात सिंघम निकेतनजी कदम यांना इतर भागांमध्ये जास्त काम लागल्यामुळे तसेच इतरत्र बदली झाल्यामुळे या भागावरचे लक्ष थोडेसे कमी झाले आहे. शिवाय याच दरम्यान स्थानिक पोलीस अधिकारी देखील बदलले गेले आहेत, याची संधी साधून अवैध धंदेवाले पुन्हा सरसावले आहेत.
इतर अधिकाऱ्यांमध्ये सिंघम सारखी “डेअरींग” नाही.म्हणुनच आम्ही पुन्हा अवैध धंदे करतोत.असे वायगाव पाटी ता.अहमदपुर येथे मटका,गुटखा,दारु व पप्लू जुगार यासारख्या दोन नंबरचे धंदेवाले कुजबूजतात. व या धंद्यांनी हा:हाकार माजवलाय,या सर्व अवैध धंद्यांनी कळस गाठलाय.तरीही या धंद्यावर रेड करणारी यंत्रणा आहे का नाही?असेल तर कारवाईसाठी का आळस करत आहे ?असे प्रश्न जनतेतून चर्चीले जात आहेत.कारण या दोन नंबरच्या धंद्यामुळे या भागातील अनेकजण कर्जबाजारी झालेत.व अनेकांचे संसार देशोधडीस लागलेत.तसेच अवैध धंदेवाले करोड पती बनलेत. खिलाडी रोडपती बनलेत.असे ही बोलले जाते.तरी या ठिकाणच्या अवैध धंद्यास मुळासकट उपटायची व सिंघम कदम यांच्यासारखी डेअरींग दाखविणार कोण ? व कधी ? याकडे जनतेचे लक्ष आहे.

About The Author