इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसच्या वतीने ए.सी.पी. परमेश्वर सेलूकर व नेव्ही चीफ एक्झिकेटिव्ह इंजि. परमेश्वर भोकरे यांचा सत्कार संपन्न

इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसच्या वतीने ए.सी.पी. परमेश्वर सेलूकर व नेव्ही चीफ एक्झिकेटिव्ह इंजि. परमेश्वर भोकरे यांचा सत्कार संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडणाऱ्या, सामान्य विद्यार्थ्यांना असामान्य बनवणाऱ्या व वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपयोगी उपक्रम राबविणाऱ्या इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसच्या वतीने युपीएस्सी उत्तीर्ण होऊन ए.सी.पी झालेले परमेश्वर सेलूकर तसेच नेव्ही मध्ये चीफ एक्सिकेटिव्ह इंजिनिअर असलेले परमेश्वर भोकरे या मान्यवरांचा क्लासेसच्या वतीने शाल, गुलदस्ता व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर रंजीत जावरे, प्रा.अशरफ खान, प्रा.राजकुमार बिरादार, प्रा.ज्ञानेश्वर केंद्रे, प्रा.वर्षा जावरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी एसीपी परमेश्वर सेलूकर यांनी त्यांच्या शालेय जीवनापासून एसीपी होण्यापर्यंतचा प्रवास सांगितला, व विद्यार्थ्यांना जिद्द, मेहनत व चिकाटीने अभ्यास करा तुम्ही नक्की यशस्वी व्हाल, व हे सर्व करताना तब्यतीची काळजी घ्या, निरोगी रहा. कारण “HEALTH IS WEALTH” असे सांगितले.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांना एम.पी.एस.सी , यु.पी.एस.सी व इंटरव्हीव्ह बद्दल विचारलेल्या सर्व प्रश्नांचे समाधानकारक उत्तरे देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. त्याच बरोबर परमेश्वर भोकरे यांनी नेव्ही इंजिनअर होण्यासाठी कोणते शिक्षण घ्यावे लागते, ते सहा महिने समुद्रात जहाजावर कसे राहतात, त्यातून ते कशाकशाची वाहतूक करतात, त्यांच्या जहाजाची साईज किती मोठी असते, ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. व ते या माध्यमातून सहामहिन्यात 15-20 देशात भ्रमन करतात. मग वेगवेगळ्या देशातील संस्कृती कशी आहे, त्यात आपली भारतीय संस्कृती श्रेष्ठ आहे, हे सांगून, शिकून कितीही मोठे झालात तरी भारतीय संस्कृतीचे जतन करा, आयुष्यभर आईवडिलांची सेवा करा.असा अनमोल सल्ला विद्यार्थ्यांना दिला. या कार्यक्रमाचे संचलन व प्रास्ताविक क्लासेसचे संचालक प्रा.सिद्धेश्वर पटणे यांनी केले तर प्रा.अशरफ खान यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौरव जैन, महारुद्र भांगे, सार्थक बेद्रे, प्रमोद कांबळे, संविधान कांबळे, वैभव गर्जे, रोहित पाटील, प्रतिक मुंडे, वेदांत चिमेगावे, सुमित मुळे, संतोष मुळे, अरुण कांबळे इत्यादी विद्यार्थांनी अथक परिश्रम घेतले.

About The Author