कु.भक्ती सिद्धेश्वर पटणे चित्रकला स्पर्धेत तालुक्यातुन तृतीय
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील विविध सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी सुप्रसिद्ध असलेल्या व गतवर्षीचा उत्कृष्ट गणेश मंडळाचा प्रथम क्रमांक पटकावलेल्या श्री शिवछत्रपती युवक गणेश मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय खुल्या चित्रकला स्पर्धेत लालबहादूर शास्त्री विद्यालयात इयत्ता आठवी मध्ये शिकत असलेली कु.भक्ती सिद्धेश्वर पटणे हिने तृतीय क्रमांक पटकवला आहे. तिच्या या यशाबद्दल श्री शिवछत्रपती युवक गणेश मंडळाच्या वतीने महाराष्ट्राचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना.संजयजी बनसोडे यांच्या हस्ते तिचा व उत्तेजनार्थ बक्षीस मिळविलेल्या चि.आदर्श सिद्धेश्वर पटणे याचा सन्मान करण्यात आला. यावेळी मंचावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील, माजी उपसभापती रामराव मामा येणकीकर, खरेदी विक्री महासंघाचे चेअरमन भरतभाऊ चामले, तहसीलदार रामेश्वर गोरे, युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विजय निटुरे, राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे प्रदेश अध्यक्ष नवनाथ गायकवाड, सुप्रसिद्ध उद्योगपती प्रकाश साखरे, सुप्रसिद्ध उद्योगपती धनाजीभाऊ मुळे, छावाचे जिल्हा अध्यक्ष दत्ता पाटील, आदर्श व उपक्रमशील शिक्षिका सौ.नीता मोरे, मंडळाचे अध्यक्ष अजिंक्य पाटील, सचिव युवा नेते बाळासाहेब पाटोदे, सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सतीश पाटील मानकीकर, युवा उद्योजक बिपीन पाटील, प्रशांत जगताप, बिरादार, बालाजी भोसले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली होती, तरीही एवढ्या स्पर्धकातून तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल भक्तीचे सर्वच क्षेत्रातून कौतुक होत आहे. नुकत्याच स्वातंत्र्य दिनानिमित्य घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय सामान्यज्ञान परीक्षेतही 5000 विद्यार्थ्यांमधून कु.भक्तीने प्रथम क्रमांक पटकवला होता, पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतही भक्तीने प्रथम क्रमांक पटकवला होता. तिच्या या वक्तृत्व, सामान्यज्ञान, चित्रकला अशा चौफेर यशाबद्दल तिचे मुख्याध्यापक अंबादास गायकवाड, पर्यवेक्षक गुळभीले , पर्यवेक्षक माधव मठवाले , कला शिक्षक महामुनी , सौ.अनिता येलमट्टे , श्री.किरण नेमट , सौ.सविता कोरे व शाळेतील सर्वच शिक्षक व कर्मचाऱ्याकडून अभिनंदन करण्यात आले.