समर्थ विद्यालयात माता गौरव दिन

समर्थ विद्यालयात माता गौरव दिन

उदगीर (एल.पी.उगीले) : तालुक्यातील एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मंगळवारी स्व. मातोश्री सुंदराबाई चौधरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माता गौरव दिन कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थासचिव प्राचार्य प्रमोद चौधरी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून लातूर येथील प्रा. डॉ. क्रांती विठ्ठलराव मोरे, अर्चना सिध्देश्वर पैके, चंद्रशेखर, पर्यवेक्षक सिद्धार्थ बोडके, संस्था सदस्य प्रा. एम. व्ही. स्वामी, प्रा. बी. एस. बाबळसुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्व. मातोश्री सुंदराबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना प्रा. डॉ. क्रांती मोरे म्हणाले, आई ही संस्काराची पहिली जननी आहे. कोणत्याही लाभाविना प्रेम करते, ती आईच म्हणून आईची महती थोर आहे. अर्चना पैके म्हणाल्या, आई-वडील असेपर्यंत त्यांची सेवा करा. नंतर कितीही प्रयत्न केले तरी ते भेटणार नाही. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य प्रमोद चौधरी म्हणाले, विद्यार्थ्यांच्या मनावर लहानपणापासूनच संस्काराचे बीजारोपण करण्यासाठी सहशालेय उपक्रम म्हणून आम्ही अशा अनेक कार्यक्रमाचे आयोजन करत असतो. विद्यार्थ्यांनी मार्कवंत न होता गुणवंत होत माणूस म्हणून जगले पाहिजेत. प्रास्ताविक रसूल पठाण यांनी केले. सूत्रसंचालन अमर जाधव यांनी तर आभार सरस्वती शेवाळे हिने मानले. कार्यक्रमास विद्यार्थी ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

About The Author