महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.के.मस्के तर प्रमुख पाहुणे म्हणून देगलूर महाविद्यालय,देगलूर येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड च्या राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.रत्नाकर लक्षटे हे उपस्थित होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.जी.पाटील, राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.राम साबदे हे उपस्थितीत होते. लक्षटे यांनी यावेळी राज्यशास्त्रातील करिअरच्या संधी या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या निर्वाचित पदाधिकारी व सदस्यांना शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय समारोपात डॉ.मस्के यांनी स्पष्ट केले, राज्यशास्त्र हे शास्त्रांचे शास्त्र आहे. व या शास्त्राचे ज्ञान प्राप्त करणारा विद्यार्थी जीवनात ताठ मानेने जगु शकतो, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय विभाग प्रमुख डॉ.राम साबदे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यशास्त्र विभागातील प्रा.डॉ.ज्ञानेश्वर यल्लावाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन बी.ए तृतीय वर्षातील विद्यार्थी व अभ्यास मंडळाचा निर्वाचित अध्यक्ष विद्यासागर कांबळे यांनी केले.