शास्त्री विद्यालयात मेरी माटी – मेरा देश उपक्रम संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) लाल बहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालय येथे मेरी माटी- मेरा देश हा उपक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला. यावेळी मंचावर अध्यक्ष म्हणून केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह शंकरराव लासूने उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी विद्यार्थी,जिल्हा परिषद लातूरचे माजी अध्यक्ष तथा भाजपा व्हीजेएनटी चे प्रदेश अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी विद्यार्थी,भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवानंद हैबतपुरे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रा. पंडित सूर्यवंशी, अनुसूचित जातीजमाती अध्यक्ष बालाजी गवारे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील, माजी नगरसेवक डॉ. चंद्रकांत कोठारे,ऍड भाऊसाहेब जांभळे, ऍड दीपक पाटील, शिवाजीराव पाटील, सुनील सावळे, मुख्याध्यापक अंबादास गायकवाड हे उपस्थित होते.
उपक्रमाचे महत्त्व सांगताना राहुल केंद्रे म्हणाले की, ” प्रथम माती आणि नंतर मग सर्व काही. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे बलिदानी,वीर, वीरांगणा यांचे स्मरण करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. आपण देखील मातीशी आपले नाते घट्ट ठेवायला पाहिजे. आज मी जो काही आहे ते केवळ या शाळेमुळेच आहे. आमदाराचा मुलगा म्हणून कधीच शाळेने वेगळी वागणूक दिली नाही. म्हणूनच मी घडलो. शिवानंद होनमोडे म्हणाले की, ” या पवित्र भारत मातेच्या कुशीत जन्म घेणारे आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत. देव,देश आणि धर्मासाठी कार्य केले पाहिजे. ही शाळा राष्ट्रनिर्माण, चरित्रनिर्माण करणारी संस्था आहे. “
या कार्यक्रमाचे संचालन, स्वागत व परिचय,आभार नीता मोरे यांनी तर प्रास्ताविक संजय कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अंबादास गायकवाड. उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी. पर्यवेक्षक लालासाहेब गुळभिले. माधव मठवाले, कृष्णा मारावार. नीता मोरे, संदीप बोधनकर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.