ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी चां जागतिक विश्वविक्रम
केडगाव : चौफुला 21 जानेवारी शिवनजली रॉयल सिटी बोरीपर्धी या ठिकाणी अयोध्येतील राममंदिरासाठी पाचशे वर्ष ज्यांनी लढा दिला व प्रसंगी प्राणार्पण ही केले त्या सर्व श्रीराम भक्तांना व कारसेवकाना तसेच भारतीय स्वातंत्र्यासाठी प्राणप्रणाने ज्यांनी लढा दिला त्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना महापुरुषाना मानवंदना देऊन राष्ट्रप्रेरित भावना निर्माण करण्यासाठी ग्रेट स्पोर्ट्स ॲकडमी च्या कु.ऋत्विक पराग कुंभार (वय 5) याने लिंबो स्केटिंग म्हणजे स्केटिंग वरती स्त्रेच करून जागतिक विक्रम वर्ल्ड रेकॉर्ड तयार केला ऋत्विक ने 7 क्रेटा गाड्या व 7 ज्वलंत लोखंडी पाईप खालून जमिनी पासून फक्ट 9 इंचां वरून जाऊन 50 मीटर हे अंतर अवघ्या 19 सेकंदात मध्ये पूर्ण केले. या जागतिक विश्वविक्रमाची नोंद ग्लोबल जनियस रेकॉड या जागतिक रेकॉर्ड नोद करणाऱ्या संस्थेने घेतली या संस्थेच्या माध्यमातून पंच मानून विशाल देसाई सर हे आले होते त्यानी हा जागतिक विक्रम पूर्ण झाला मानून जाहीर केले ऋत्विक ला प्रोत्साहन देण्यासाठी विवीध शेत्रातील मान्यवर उपस्थित होते त्या मध्ये शुभांगीताई धायगुडे आईसेवभाव संस्था प्रियांका दाने महाराष्ट्र पोलीस, रुपाली टेंगले महारष्ट्र पोलिस, नितीन जगताप सदस्य, पूनम बारवकर सरपंच केडगाव संदीप टेंगले समर्थ पोलिक भरती प्रशिक्षण केंद्र हे उपस्थितीत होते ऋत्विक ला मार्गदर्शान ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी चे समाधान दाने गणेश घुगे यश बारवकर आकाश कसबे व त्याचे वडील पराग कुंभार यांनी दिले.