एम.एस.बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयाला एआयसिटी अंतर्गत नवीन अकरा अभ्यासक्रमास मान्यता
लातूर (प्रतिनिधी) : श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर, एम.एस.बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालय, लातूर, श्री देशीकेंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, लातूर, श्री महात्मा बसवेश्वर प्राथमिक विद्यामंदिर व बालक मंदिर, लातूर, श्री शंभुलिंग शिवाचार्य प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय, लातूर, शिवाचार्य प्राथमिक विद्यालय, लातूर, श्री निळकंठेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, लातूर, कॉलेज ऑफ फार्मसी, लातूर, अल्लमप्रभू कॉलेज ऑफ फार्मसी, लातूर, अभियांत्रिकी महाविद्यालय अंबाजोगाई, जि. बीड, कै. पूज्य टी.बी.गिरवलकर तंत्रनिकेतन महाविद्यालय, अंबेजोगाई जि. बीड अशा विविध शाळा, अभियांत्रिक आणि कला, वाणिज्य, विज्ञान, समाजकार्य, संगणकशास्त्र, व्यावसायिक महाविद्यालये चालविले जातात.
एम.एस.बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालय हे मराठवाड्यातील एक नामवंत आणि गुणवंत विद्यार्थी घडविणारे एकमेव महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाची सुरुवात सन १९८३ रोजी झाली असून सुरुवातीला सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल हया विद्याशाखा होत्या. त्यानंतर सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सुरुवात केली. तसेच विद्यार्थ्यांचा कॉम्प्युटर क्षेत्राकडे वाढता ओढा पाहून मास्टर इन कॉम्प्युटर एप्लीकेशन (एमसीए) हा अभ्यासक्रम सुद्धा सुरू करण्यात आला.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये या महाविद्यालयात डिप्लोमा इन सिव्हील इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजीनियरिंग, डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग, डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन (एमबीए) इन फायनान्स, मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन (एमबीए) इन मार्केटिंग अँड फायनान्स, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी सी.एस.इ.(एआयएमएल), आर्किटेक्चरल असिस्टंटशिप आणि बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अप्लीकेशन (बीसीए) अशा एकूण अकरा नवीन अभियांत्रिकी विषयाला अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, (ए.आय.सी.टी.इ.), नवी दिल्ली या संस्थेद्वारे मंजुरी मिळाली आहे.
या सर्व नवीन अभ्यासक्रमाविषयी श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ सांगवे, उपाध्यक्ष माधवराव पाटील (तपसेचिंचोलीकर), संस्थेचे सचिव माधवराव पाटील टाकळीकर, सहसचिव सुनील मिटकरी, कोषाध्यक्ष विजयकुमार रेवडकर, कार्यकारी संचालक प्रदीप दिंडीगावे, संचालक राजेश्वर बुके, संचालक बस्वराज (राजू) येरटे, संचालक काशिनाथ साखरे, संचालिका ललिता पांढरे, संचालक राजेश्वर पाटील, संचालक बाबुराव तरगुडे, संचालक प्रभूप्पा पटणे, संचालक गुरुलिंग धाराशिवे आणि संचालक महेश हालगे यांनी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, (ए.आय.सी.टी.इ.), नवी दिल्ली या संस्थेचे आभार मानून महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. या नवीन अभ्यासक्रमाच्या माध्यमातून अभियांत्रिकी विषयांमध्ये गुणवान आणि गुणवंत विद्यार्थी घडविले पाहिजे असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे.
या नवीन अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश हल्लाळी, प्रा. जी.सी.शहाबादे आणि डॉ.एन.एम. हलगरे यांनी केले आहे.