लातुरात प्रथमच एक वर्षाच्या बालकाची ओपन हार्ट सर्जरी

लातुरात प्रथमच एक वर्षाच्या बालकाची ओपन हार्ट सर्जरी

विवेकानंद रुग्णालयात एकाच दिवशी झाल्या पाच हृदयशस्त्रक्रिया

लातूर (प्रतिनिधी) : ओपन हार्ट सर्जरी अर्थात हृदय शस्त्रक्रिया ही अतिशय किचकट आणि गुंतागुंतीची असते. त्यातच लहान मुलाची ओपन हार्ट ही तर काळजीत टाकणारीच! लातूर येथील विवेकानंद रुग्णालयात डॉक्टरांनी एक वर्षाच्या बालकाची टेट्रॉलॉजी ऑफ फेलॉट नावाच्या हृदयविकारसाठी ओपन हार्ट सर्जरी करून बालकाला जीवदान दिले. विशेष म्हणजे रुग्णालयात एकाच दिवशी (२६ सप्टेंबर २०२१ रोजी) बालकांच्या विविध प्रकारच्या पाच हृदयशस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या.यात एक ओपन हार्ट आणि चार बिनटाक्याच्या हृदयशस्त्रक्रिया केल्या गेल्या.

टेट्रॉलॉजी ऑफ फेलॉट (Tetralogy Of Fallot / TOF) या हृदयाच्या आजारामध्ये बालकाच्या हृदयामध्ये चार दोष असतात. यामध्ये हृदयात मोठे छिद्र असणे, हृदयाच्या उजव्या बाजूची झडप अरुंद असणे व डाव्या बाजूची झडप उजवीकडे सरकलेली असणे तसेच हृदयाच्या उजव्या बाजूचे स्नायू अधिक जाडीचे असतात. अशा आजारासाठी औषधोपचार पुरेसे ठरत नाहीत. एवढेच काय बिनटाक्याची शस्त्रक्रियाही शक्य नाही. त्यासाठी ओपन हार्ट सर्जरी हा एकमेव पर्याय असतो. या शस्त्रक्रियेला टेट्रॉलॉजी ऑफ फेलॉट सर्जरी म्हटले जाते. या शस्त्रक्रियेनंतर हार्ट पूर्णपणे सामान्य होते. वृद्ध नागरिकांच्या हृदयविकारासाठी ज्या पद्धतीने ओपन हार्ट सर्जरी बायपास केली जाते त्याच पद्धतीने ही सर्जरी होते.
चाकूर तालुक्यातील ब्रह्मवाडी येथील एक वर्षाच्या मुलाला हा आजार झालेला होता. या रोगाचे निदान डॉ. नितीन येळीकर, मुलांचे हृदय रोगतज्ज्ञ यांनी केले आणि बालकास शस्त्रक्रिया करणे अत्यावश्यक असल्यामुळे बालकास शस्त्रक्रियेसाठी लातूर येथील विवेकानंद रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयातून आलेले मुलांचे ऱ्हदय शल्य चिकित्सक डॉ. धनंजय माळणकर, मुलांचे हृदय रोगतज्ज्ञ डॉ. मंगलेश निंबाळकर, भूलतज्ज्ञ डॉ. शिवाजी माळी, दिनेश के व जिनिल राज, यांच्यासह विवेकानंद रुग्णालयातील मुलांचे हृदय रोगतज्ज्ञ डॉ. नितीन येळीकर, अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. औरंगाबादकर यांच्या चमूने त्या बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. बालकाची प्रकृती व्यवस्थित असून एक-दोन दिवसात त्याला रुग्णालयातून सुट्टी दिली जाणार आहे. शस्त्रक्रियेदरम्यान विवेकानंद रुग्णालयातील डॉक्टर्स, व्यवस्थापन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

याच दिवशी बालकांच्या हृदयाचे छिद्र बुजवण्याच्या बिनटाकयाच्या ४ शस्त्रक्रियाही रुग्णालयात पार पडल्या. या चारही बालकाची रुग्णालयातून सुट्टी झाली. विशेष म्हणजे या सर्व शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतून मोफत करण्यात आल्या. पूर्वीच्या काळी पुणे- मुंबई किंवा हैदराबाद येथे जाऊन कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रिया आता विवेकानंद रुग्णालयात होत आहेत. लातूरसह मराठवाडा आणि सीमावर्ती भागातील रुग्णांना याचा मोठा लाभ होत आहे. यापुढेही अशा शस्त्रक्रिया विवेकानंद रुग्णालयात होत राहतील व याचा गरजू रुग्णाना फायदा होईल,असे मुलांचे हृदय रोगतज्ज्ञ डॉ. नितीन येळीकर या वेळी म्हणाले. पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे काका, डॉ. गोपीकिशन भराडिया, डॉ.अरुणा देवधर, डॉ. ब्रिजमोहन झंवर, डॉ. राधेश्याम कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनामुळेच ही शस्त्रक्रिया यशस्वी होऊ शकली, असेही ते म्हणाले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!