सध्याच्या जगात सावधगिरी आणि प्रेम यावर यश अवलंबून आहे – गोरख दिवे

सध्याच्या जगात सावधगिरी आणि प्रेम यावर यश अवलंबून आहे - गोरख दिवे

उदगीर (अँड.एल.पी.उगीले) : जीवन जगत असताना सध्याच्या जगात प्रत्येक व्यक्तीने अतिशय सावधगिरीने वागणे गरजेचे आहे. कारण एवढ्या गतीने जग बदलते आहे, तेवढ्याच गतीने लोकांची फसवणूक वाढू लागली आहे. अनेक ठिकाणी ऑनलाईन ह्याकिंग करून लोकांना लुबाडणे सर्रास चालू आहे. अनेक वेळा अनेक बँका वेळोवेळी आपल्याकडून पासवर्ड विचारला जात नाही, जन्मतारीख, गाडीचा नंबर विचारला जात नाही. आपला कोड विचारला जात नाही. इत्यादी सांगून देखील लोक फसतात. सतत नवीन नवीन पासवर्ड सेट करत राहणे गरजेचे आहे. तीन चार महिन्यातून आपला पासवर्ड बदलत जावे. जेणेकरून बँकेतून फसवणूक होणे शक्य होणार नाही. सुरुवातीला आपल्या घराचे दरवाजे, दारे, तोडून ,कपाट तोडून, चोरी करावी लागत होती. मात्र आता चोरी करण्यासाठी तुमच्या घरी येण्याची आवश्यकता नाही. तर हजारो किलोमीटर दूर आपल्या एका चुकीच्या क्लिक वरून आपली आर्थिक फसवणूक सहज शक्य आहे. याचेही गांभीर्याने परिणाम विचारात घेणे गरजेचे आहे.
वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून प्रलोभने दाखवली जातात. त्या प्रलोभनांनाच्या लिंक कधीही ओपन करू नका. नामांकित कंपन्या जसे की फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, मंत्रा, स्नॅपडील, शॉप क्लूज, ऑनलाइन व्यवहार करतेवेळी बऱ्याचदाआॅफर येतात तेव्हा अशा कंपनीच्या कस्टमर केअरला संपर्क करत असताना बऱ्याचदा फेक साइटवर आपला संपर्क होतो अशा साईट ओळखूनच त्याच्याशी पुढील व्यवहार करावा. परवाच बोगस मेसेज करून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे बिल एकाने उचलून फसवणूक केली आहे. तसेच प्रलोभनाला साठी तुम्हाला लॉटरी लागली आहे, तुम्ही इतके पैसे भरा तुम्हाला इतके पैसे मिळतील, कंपनीकडून तुम्हाला इतके लॉटरी लागली आहे .अशा पद्धतीच्या लिंक ओपन करू नका .कोणतीही बँक क्रेडिट, डेबिट कार्ड ची तपशीलवार माहिती तुमच्या ईमेल किंवा फोन द्वारे शेअर करू नका. कोणतीही बँक क्रेडिट, डेबिट कार्ड चे विवरण इमेल वा फोन वर विचारत नसतात तुम्ही ते शेअर करू नका. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड अनोळखी व्यक्तींच्या स्वाधीन करू नका .त्याचा गैरवापर होऊ शकतो. यासोबतच ऑनलाइन फसवणूक करणारे अपराधी एखादी बँक ,शासकीय कार्यालय ,कंपनी ,इन्शुरन्स एजंट या नावाने आपल्याशी संपर्क साधून आपल्याकडील बँक व्यवहाराची माहिती घेऊन आपली फसवणूक करू शकतात. असे फोन कॉल्स आल्यानंतर त्यांना कोणीही रिस्पॉन्स देऊ नका. तसेच कोणत्याही फोन बाबत किंवा ऑनलाईन काॅलच्या बाबत शंका आल्यास तात्काळ पोलिसांना कल्पना द्या. आपल्याकडील एटीएम चा पिन कोणासोबतही शेअर करू नका. आपल्याकडे येणाऱ्या ओटीपी नंबर कोणालाही देऊ नका. कोणत्याही अज्ञात व्यक्तीला आपले डेट ऑफ बर्थ सांगू नका .अनोळखी व्यक्ती आपल्याला एखादी लिंक पाठवून त्या लिंक वर क्लिक करा असे सांगून आपल्या डिवाइस मधील बँक व्यवहाराशी संबंधित संपूर्ण माहिती चोरू शकतात. या आधुनिक चोरीबद्दल जाणून घ्या .आणि सावध राहा. त्यासोबतच एखादी अनोळखी महिला फेसबुक चॅटिंग च्या मदतीने आपल्याशी जवळीकता साधत असेल किंवा चॅटिंग च्या माध्यमातून स्वतः लैंगिक चाळे करून आपल्यास ही लैंगिक चाळे करण्यास भाग पाडत असेल तर सावध राहा, आपली नकळत रेकॉर्डिंग केली जात असते. आणि त्या रेकॉर्डिंग च्या आधारे आपल्याला पुन्हा भीती घालून, ब्लॅकमेल करून फसवले जाते. अशा पद्धतीचे फ्रॉड मोठ्या शहरातून खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत.
त्यासाठी आपणही सावध राहणे गरजेचे आहे. एटीएम मधून पैसे काढत असताना आपला एटीएम पिन कोड कोणालाही दिसणार नाही याची पुरेपूर काळजी घ्या. आपला लॅपटॉप, फोन मोबाईल वरील अतिशय महत्वाची माहिती कोणीतरी लक्ष ठेवून चोरू शकतो. त्याचे गांभीर्य विचारात घ्या. आपला फोन किंवा लॅपटॉप इतरांच्या हातात देऊ नका. ऑफिशियल वेबसाइट वरूनच कस्टमर केअर नंबर द्या, आपण घराबाहेर जाणार असाल तर आपल्या शेजारीपाजारी याची कल्पना द्या. तसेच पोलिसांना ही कल्पना द्या .कारण आपल्या घराला दिसणारे कुलूप हे आपण घरी नाहीत याचे धडधडीत चिन्ह आहे, आणि ते चोराला निमंत्रण आहे. त्यामुळे सावधानता बाळगा. घरामध्ये एकोप्याने राहा. घरात वावरत असताना प्रत्येकाने माणुसकीची जाण ठेवावी. आजची सुनबाई उद्याची सासू आहे ,त्यामुळे सासूने सुनेला किंवा सुनेने सासूला त्रास देण्याचा प्रयत्न करू नये. घरात कोणीही कोणाला टाकून बोलू नये. आपले घर हे आदर्श वाटावे, असे असावे तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून गुगल प्ले, स्टोअर मधून कोणते ॲप्स डाऊनलोड करू नका. विशेषता स्क्रीन शेअर होणारे ॲप्स डाऊनलोड करायला लावून फसवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. याचीही गांभीर्याने दखल घ्या. वेगवेगळ्या कंपन्यांकडून फुकट रिचार्ज केले जात आहे, आमच्या कंपनीच्या वाढदिवसानिमित्त किंवा आमच्या कंपनीला इतके वर्ष झाले म्हणून आम्ही फुकट डाटा देत आहोत. अशा फसव्या जाहिराती करून आपली फसवणूक केली जाऊ शकते. त्यामुळे अशा कोणत्याही चुकीच्या लिंक क्लिक करू नका. प्रत्येकाने विचार करावा की, जेव्हा वेळ भेटेल तेव्हा पोलिसांशी संपर्क साधा, जेणेकरून पोलिसाकडून तुम्हाला सहज मदत करता येऊ शकेल .तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. पोलीस देखील माणूस आहे. याची जाण ठेवून तुम्ही देखील पोलिसांना सहकार्य करा.
घरात एकटे असाल तर खिडक्या, दारे बंद करा. अनोळखी व्यक्तीला घरामध्ये प्रवेश देऊ नका. अनोळखी व्यक्ती अचानक घरासमोरून सोने उजळून देतो, दुप्पट करून देतो, असे चुकीचे सांगून महिलांची फसवणूक करत असतात. अशा घटना अनेक वेळा घडून देखील महिला सतत फसत असतात.याची जाणीव ठेवून प्रत्येकाने सावधगिरी बाळगली पाहिजे. प्रत्येक घरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले गेले पाहिजेत. जेणेकरून कोण कोण गेले? याची माहिती आपल्याला उपलब्ध होऊ शकेल. या सोबतच सामाजिक बांधिलकी म्हणून लहान मुलांना दुचाकी चालवायला देऊ नका. दुचाकी चालवणाऱ्या तरुणांनी हेल्मेट सक्तीने वापरावे. हेल्मेट वापरल्यामुळे अनेक अपघातातून अनेक तरुण वाचले आहेत .आणि दुर्दैवाने ज्यांनी हेल्मेट वापरले नाहीत ते वारले आहेत. अशा हजारो घटना आहेत. आम्ही पोलीस म्हणून काम करत असताना अशा अनेक घटना प्रत्यक्ष पाहिले आहेत. याची माहिती पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांनी भाविक भक्तांना दिली. याप्रसंगी मंदिर संयोजन समितीच्या वतीने दिलीप कोटलवार परिवाराच्यावतीने मंदिरासाठी ही जागा दिल्याबद्दल गोरख दिवे यांच्या हस्ते दिलीप कोटलवार आणि परिवार यांचा सत्कार करण्यात आला, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज भंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक दीपक चिद्दरवार यांनी केले.

About The Author