दिलीपरावजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जागृती करतेय शेतकऱ्यांची प्रगती – विवेक जाधव

उदगीर (एल. पी. उगिले) : लातूर जिल्ह्यात माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मांजरा साखर कारखान्याचा ग्रुप आणि लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाचा कणा बनत आहे. जागृती साखर कारखान्याने चालू हंगामात 151 कोटी 68 लाख 240 रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रदान केले आहेत. आत्तापर्यंत अकरा हंगामामध्ये जागृती कारखान्याने १२१६ कोटी ६१ लाख ७७ हजार रुपये शेतकऱ्यांना ऊस बिलापोटी वाटप केले आहेत. यामुळेच “जागृती करते शेतकऱ्यांची प्रगती”असे जणू ब्रीदवाक्य निर्माण झाले आहे. मराठवाडा आणि विदर्भातील खाजगी साखर कारखानदारीत अव्वल स्थानावर असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी पेक्षा अधिक भाव देणाऱ्या जागृती शुगर कारखान्याने चालू हंगामात सहा लाख 32 हजार मॅट्रिक टन उसाचे विक्रमी गाळप करून चालू हंगामात 151 कोटी 68 लाख 240 रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. मांजरा साखर परिवाराच्या धोरणानुसार चालू हंगामात 2200 रुपये मॅट्रिक टन प्रमाणे पहिल्या हप्त्या पोटी 139 कोटी चार लाख 220 रुपये तर दुसरा हप्ता दोनशे रुपये प्रमाणे 12 कोटी 64 लाख असे एकूण 151 कोटी 68 लाख 240 रुपये शेतकऱ्यांना अदा केले आहेत. त्यामुळे देवनी, शिरूर अनंतपाळ, निलंगा, चाकूर, उदगीर, लातूर, औसा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एका अर्थाने दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या संपन्न करण्याचा प्रयत्न चालू आहे, असे म्हटले तर वावगे नाही. असे विचार विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी गंगापूर- भाकसखेडा चे चेअरमन विवेक पंडितराव जाधव यांनी व्यक्त केले आहेत.
कारखान्याच्या चेअरमन गौरवीताई भोसले देशमुख यांनी उजाड माळराणावर नंदनवन फुलवत, शेतकऱ्यांच्या प्रगतीच्या दिशेने टाकलेले एक पाऊल म्हणजे, तळेगाव येथील जागृती शुगर हे आहे. या कारखान्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न केले गेले. शेतकऱ्यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे, ही तळमळ माजी मंत्री तथा या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांची असल्याने त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अत्यंत काटेकोर नियोजनाने प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना झुकते माप देत जागृती शुगरने विकासाचा एक एक टप्पा टाकत आज प्रगतीचा कळस गाठला आहे. भागातील शेतकऱ्यांसाठी अर्थात ऊस उत्पादकांसाठी जागृती शुगर एक वरदान ठरले आहे. असेही विवेक पंडितराव जाधव यांनी सांगितले.