वाढवणा येथील अनेक रस्त्यांची दुर्दशा नागरीक त्रस्थ प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष
उदगीर (प्रतिनिधी) : तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्येचे गाव वाढवणा बुद्रुक असुन सतरा सदस्यांची ग्रामपंचायत असुन दहा महिला व सात पुरुष सदस्य असुन एक माजी पंचायत समिती सदस्य व एक माजी पंचायत सभापती दोन माजी उपसरपंच एक माजी सरपंच अशा पदाचे गाडे अनुभव असलेले सदस्य म्हणुन ग्रामपंचायत मध्ये असुन देखील गावातील समस्या कडे लक्ष दिले जात नाही नावालाच सदस्य झाले आहेत की काय अशी चर्चा सदस्यांना निवडून दिलेल्या सहा ही वार्डातील मतदारातुन होताना दिसत आहे ग्रामस्थांच्या समस्या कडे लक्ष देत नाहीत म्हणूनच गावातील रस्त्यांची, नाल्यांची,दुर्दैशा झाली असल्याची सोशल मीडिया व्हाट्सअप स्टेटस व फेसबुकवर ग्रामस्थ चिकलं झालेल्या रस्त्यांचे फोटो व्हायरल करून झोपीचा सोंग घेतलेल्या प्रशासनास जागृत करण्याचे काम सोशलमीडिया द्वारे केले जात असुन ग्रामस्थांना शाळकरी मुलांना जेष्ठ नागरिक महिलांना रस्त्यावरून चालता येत नाही तरी देखील संबधित स्थानिक प्रशासन व तालुका प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याची ग्रामस्थातून संतप्त चर्चा होत असुन तरुण मोबाईलवरून फोटो काढुन व्हायरल करीत असुन वरील रस्त्याचे फोटू व्हायरल झाली आहेत ते रस्ते मुस्लिम समशान भूमी इदगाह तरवडे नगर कडे जाणारा रास्ता बुंदराळे, कासार गल्ली, बेळसांगवी रोड ज्ञानेश्वर सा मिल कडे जाणारा रस्ता, थोंटे, कलकोटे गल्ली, रहेमत नगर मस्जिद,प्राथमिक शाळे जवळील रस्ता, छत्रपती शिवाजी गल्ली, अमिरी मस्जिद बुरुड,भुई गल्ली व नवीन वस्तीतील अनेक रस्त्यांची नाल्यांची दुर्दशा झाली असुन ग्रामस्थांना चालताना नाकी नऊ येत असुन ग्रामस्थ संतप्त झाले असुन संबंधित प्रशासनाने जातीने लक्ष घालून त्वरीत रस्त्याची डागडुजी मुरूम घालुन सध्या चालता येईल अशी रस्त्याची सोय करण्यात यावी तसेच ग्रामपंचायत ठराव घेऊन वरिष्ठ पातळीवरून लवकरात लवकर सिमेंट, किंवा फेव्हर ब्लॉक रस्त्याची मंजूरी करून घेऊन लवकरात लवकर वाढवणा येथील वरील सर्व रस्ते बनवून ग्रामस्थांची होणारी गैर सोय दुर करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.