मणिपूर येथील महिला वरील अत्याचार माणुसकीला कलंक – उषा कांबळे

मणिपूर येथील महिला वरील अत्याचार माणुसकीला कलंक - उषा कांबळे

उदगीर (प्रतिनिधी) : मनिपुर राज्यामध्ये गेल्या दोन-तीन महिन्यापासून महिलांना नग्न करून धिंड काढणे, त्यांचा छळ करणे. इतकेच नाही तर नग्न करून त्यांना कवायत करायला लावणे. अशा पद्धतीचे मानवतेला कलंक म्हणता येतील असे अत्याचार सुरू असून यासंदर्भात राज्य शासन किंवा केंद्र शासन गांभीर्याने घेत नाही. असा आरोप काँग्रेस महिला आघाडीचे नेते तथा माजी नगराध्यक्ष उषाताई कांबळे यांनी केला आहे. याप्रसंगी त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर ज्योती सोमवंशी डॉक्टर अंजुम कादरी सौ ज्योती डोळे वंचित बहुजन आघाडीच्या मायाताई कांबळे वैशाली कांबळे भारती सूर्यवंशी उमाताई काळे शशिकला पाटील आशा शिंदे इत्यादी महिलाही उपस्थित होत्या.

उदगीर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने भर पावसात धरणे आंदोलन करून मणिपूर घटनांचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच मणिपूर राज्य सरकार बरखास्त करण्यात यावे. अशी मागणी एका निवेदनाद्वारे प्रशासनाकडे करण्यात आली. या निषेध आंदोलनासाठी शहरातील अनेक राजकीय पक्षाचे व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी अनेक कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवत आपले मनोगत व्यक्त केले. निषेध करून मणिपूर मध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी. अशी मागणी केली. या मागणीचे निवेदन तहसील कार्यालय येथे तहसीलदार यांच्या वतीने मंडळाधिकारी शंकर जाधव, तलाठी पंकज कांबळे, बाबासाहेब सोनकांबळे यांना देण्यात आले. या धरणे आंदोलनामध्ये माजी आमदार शिवराज तोंडचिरकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय राजेश्वर निटुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी मुळे, आशिष राजुरकर, दिलीप कांबळे, सिद्धेश्वर लांडगे, अजित शिंदे, श्रीनिवास एकुर्गेकर, जितेंद्र शिंदे, प्रा. मारुती कसाब, संदीप देशमुख, सय्यद जानी सतीश पाटील मानकीकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author