देव माणुस : भगवानराव रामचंद्रराव पाटील तळे गावकर उर्फ भगवान दादासाहेब

देव माणुस : भगवानराव रामचंद्रराव पाटील तळे गावकर उर्फ भगवान दादासाहेब

जगात वेगवेगळ्या व्यक्तीमत्वाची माणसे आसतात. प्रत्येकाचे वागणे, बोलणे हे इतरापेक्षा वेगळे असते. काही माणसान कडे दिव्यदृष्टी आसते. त्या द्रष्टीच्या व्यक्तीमत्वाची भूरळ समाजाला त्यांच्या प्रकाशमान सेवा, निती, न्याय सहिष्णुतेच्या मानवी मूल्यातून दिसून येते. परमेश्वराकडे आपण श्रध्दा व भक्ती- भावाने नमन करतांना आपल्या सुखाची समाधानाची अपेक्षा बाळगून आसतो. ईश्वर म्हणजे दुखी तांचे दुःख दुर करणारा सुख आणि आनंदी ठेवणारी अदृश्य शक्ती होय. भगवान दादांच्या अचरणाची नम्रता, समाजसेवेची विशालता, स्नेहभावाची व जिव्हाळ्याची सागरक्षमता ही पाहिल्यास त्यांच्याजवळ येणारा प्रत्येक सहवाशी त्यांच्यातील देवमाणूस अनुभवतो. दादासाहेबांनकडे नितीअंलकाराची दिव्य दृष्टी आहे. भगवानदादांचा 31 जुलै 2023 रोजी 62 वा वाढदिवस साजरा होत आहे. दादासाहेब मातृभक्त ,पितृभक्त व समाजभक्त आहेत. भगवान दादांचा जन्म 31 जुलै 1961 मध्ये झाला. सहकार व शिक्षण महर्षी स्व रामचंद्रराव विठ्ठलराव पाटील तळेगावकर तथा भाऊसाहेब यांचे ते जेष्ठ चिरंजीव. स्व. भाऊसाहेबांनी घालून दिलेली समाजसेवेची शिकवण दादांनी पुर्णपणे आचरणात उतरवलेली आहे. तळेगावकर पाटील परिवार परीसरातील लोकांचे अलोट प्रेमाचे श्रध्दास्थान आहेत.त्या परिवाराचे दादासाहेब प्रमुख असुन भाऊसाहेबांनी समृद्ध केलेल्या लोक जागृती शिक्षण संस्थेचे दादासाहेब सचिव आहेत. लोकजागृती शिक्षण संस्थेचा विकास उतरोत्तर दादांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. दिवसेंदिवस शिक्षण महागडे बनत आसतांना लोकाजागृती शिक्षण संस्थेने विनामूल्य शिक्षण सेवा देवून देवणी तालुका परीसरातील शेतकरी, शेतमजुर, कष्टकरी छोटे व्यवसायीक इ. गोरगरीबांच्या मुलांनपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचविली आहे.

ग्रामीण भागातील पालकांना आपल्या पाल्यांना वैद्यकीय व अभियांत्रीकी क्षेत्रात शिक्षणाच्या संधी मिळाव्यात या करीता काळाची पावले ओळखून देवणी सारख्या ग्रामीण भागातील विवेक वर्धिनी उच्च माध्यमिक विद्यालयात मोफत NEET, JEE, M.H.T.CET. परीक्षेच्या मार्गदर्शन अध्यापनाची सोय 2019 पासूनच दादांच्या प्रेरणा व मार्गदर्शनातून सुरू करण्यात आली आहे.त्याचाच परिणाम 2023 च्या निकालात 37 विद्यार्थी NEET उत्तीर्ण व 93 विद्यार्थी M.H.T. CET. उत्तीर्ण झाले आहेत. लोकजागृती शिक्षण संस्थेची 2 वरिष्ठ महाविद्यालये, दोन उच्च माध्यमिक विद्यालये, 5. माध्यमिक विद्यालय व एक प्राथमिक विद्यामंदीर असा मोठा पसारा आहे.

दादासाहेबांनी शिक्षण क्षेत्रा सोबत सहकार क्षेत्रातही विकासाची गरुड भरारी मारलेली आहे. स्व. भाऊसाहेब अर्बन को.आप. बँकेच्या 7 शाखा उदगीर, देवणी, वलांडी,निलंगा , चाकूर, लातूर, हंडरगुळी येथे उत्तमरित्या चालत आहेत. दादासाहेब स्व. भाऊसाहेब सहकारी बँकेचे चेअरमन आहेत व लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आहेत.

राजकारणातील काम करणाऱ्या लोकांचे फसवे वागणे, बोलने ही सामान्य बाब समाजासाठी झाली आसताना ही काही मानसे असामान्य व्यक्तीमत्वाची असतात नितीमान मानवी मूल्य जपणारी मानसे ही ईश्वरासमान असतात दादासाहेब हे परमेश्वरच आहेत त्यांच्यातील देव मानूस पाहण्याची योग्यता सर्वानकडे यावी हीच अपेक्षा.

दादासाहेबांच्या समाज कार्यानि सुखी झाले दीन…जन भारावून जाते सर्वांचे जिव्हाळ्याच्या नम्रतेने मन…

दादा साहेबांच्या 62व्या वाढदिवसानिमीत्य माझा सिरसाष्टांग दंडवत दादासाहेबांना दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

राजे. डी. व्ही.
उपप्राचार्य विवेक वर्धीनी उच्च माध्यमिक विद्यालय देवणी.
7875669376

About The Author