महादेव मंदिरास ‘ ब ‘ पर्यटनाचा दर्जा मिळवून देणार – ना.बनसोडे
उदगीर(एल.पी.उगीले) : तालुक्यातील शंभु उंबरगा गावातील महादेवाचे मंदिर हे भाविकांचे श्रध्दास्थान असुन या भागातील हजारो नागरीकांचे ग्रामदैवत आहे,त्याचा विकास होण्यासाठी पर्यटनाचा ब दर्जा मिळउन देण्यासाठी आपण प्रयत्न करू,असे आश्वासन ना.संजय बनसोडे यांनी दिले.
ते उदगीर तालुक्यातील मौजे शंभु उबंरगा येथे आयोजीत अधिकमासानिमित्त सर्व धर्मीय अखंड शिवनाम सप्ताह व २१०० सदभक्तांचा परमरहस्य पारायण सोहळ्यात बोलत होते.
याप्रसंगी उदगीरचे शंभूलिंग शिवाचार्य महाराज, हानेगावचे शंकरलिंग शिवाचार्य महाराज , बसवलिंग शिवाचार्य महाराज, निळकंठ शिवाचार्य महाराज, शिवराज नावंदे गुरुजी, भगवंतराव पाटील चामरगेकर, राजेश्वर स्वामी महाराज, दिलीप स्वामी महाराज, शिवलिंग पाटील किनीकर, रामदास पाटील सुमठाणकर, सभापती शिवाजी हुडे, प्रा.शिवाजी मुळे, कल्याण पाटील, श्याम डावळे, शिवानंद हैबतपुरे, ज्ञानेश्वर पाटील , माधवराव बर्गे, शंकरराव मोरगे, गौतम पिंपरे, विवेकानंद स्वामी, वीरभद्र महाराज, रामलिंग महाराज, शिवकांत स्वामी, कैलास जामकर,
विठ्ठल चव्हाण , उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार रामेश्वर गोरे, गटविकास अधिकारी प्रवीण सुराडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत , बांधकाम विभागाचे उपअभियंता एल.डी. देवकर,वसंत पाटील, गजानन बिरादार, लिंगेश्वर स्वामी आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना.संजय बनसोडे यांनी सांगितले की, उदगीर शहरात
७ कोटीचे वीरशैव लिंगायत भवन उभारण्याचे काम चालु आहे तर जंगम समाजाच्या मागणीनुसार रेणुकाचार्य संस्कार भवनची निर्मिती करत आहोत.
मी अध्यात्मला मानणारा कार्यकर्ता असल्याने शंभु उंबरगा गावातील नागरिकांच्या आग्रहाखातर मी इथे उपस्थित असुन आजपर्यंत या गावाला सहा कोटीच्या वर निधी उपलब्ध करुन देवुन या गावचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या मागील कार्यकाळात हत्तीबेट पर्यटन स्थळाला व डोंगरशेळकी मंदिराला ‘ब’ दर्जा मिळवुन दिला असल्याचे सांगून येथील महादेव मंदिरास ‘ ब ‘ दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचाही शब्द ना.बनसोडे यांनी दिली.
यावेळी जिल्हाभरातुन आलेले भाविक भक्त, कीर्तनकार, प्रवचनकार, टाळकरी, शंभु उंबरगा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.