परिसस्पर्श समिती जिल्हा सचिव पदी प्रा.डॉ.कमलाकर गव्हाणे
उदगीर (प्रतिनिधी) : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अधिसूचनेनुसार राज्यातील नॅक मूल्यांकन न झालेल्या व वैधता संपलेल्या महाविद्यालयाचे नॅक मूल्यांकन होण्याच्या दृष्टीने परिस स्पर्श योजना सुरू झाली. लातूर जिल्हा समिती सचिव पदी महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील इंग्रजी विभागातील प्राध्यापक तथा अंतर्गत गुणवत्ता सुनिश्चयन कक्षाचे प्रमुख प्रा.डॉ.कमलाकर गव्हाणे यांची नियुक्ती स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड चे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी केली आहे. या समितीतर्फे तज्ञांची व्याख्याने, कार्यशाळा, संबंधित महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन मार्गदर्शन केले जाणार आहे. या निवडीबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, उपाध्यक्ष डॉ.रेखा रेड्डी आणि अॅड.प्रकाश तोंडारे, सचिव रामचंद्र तिरुके,सहसचिव अ ॅड.एस.टि. पाटील चिघळीकर आणि डॉ.रामप्रसाद लखोटिया, कोषाध्यक्ष भालचंद्र चाकूरकर तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ.आर.के.मस्के, उपप्राचार्य डॉ.एस.जी.पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.