चापोली परिसरातील 1रु त शेतकरी पीक विम्या पासून शेतकरी वंचित रहाणार?
चापोली (प्रतिनिधी) : शासनाच्या वतीने शेतकरी हितासाठी म्हणून एक रुपयांमध्ये पिक विमा योजना सुरू केली खरी, मात्र प्रत्यक्षात कधी सर्वर डाऊन तर कधी तांत्रिक अडचणी सांगून ऑन लाईन विमा घेत नाहीत. खरोखरच शेतकऱ्यांना सहकार्य करायची भावना असेल तर पिक विमा साठी मुदतवाढ देऊन पिकविम्या साठीचे अर्ज ऑफलाईन स्वीकारले जावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
चापोली येथील जिल्हा मध्यवर्ती बँक अंतर्गत येणाऱ्या नायगाव,आनंदवाडी,हिप्पळणेर,शंकर वाडी, चापोली ,उमर्गा,मुलकी, फतेपुर, आजणसोंडा, येथील अनेक शेतकऱ्याचा पीक विमा ऑनलाईन पद्धतीने घेतला गेला जात नसून अनेक शेतकरी महाराष्ट्र शासनाच्या 1 रु पीकविमा योजने पासून वंचित रहात आहेत.जिल्हा बँकेच्या चापोली शाखेत, ऑनलाईन सेवा केंद्रावर चकरा मारून मारून पारेशान झाले आहेत. ऑनलाईन केंद्रावर शेतकऱ्याची पूर्ण माहिती भरल्या नंतर मोबॉईल नंबरची त्रुटी, किंवा यू आय डी त्रुटी,किंवा बँके पास बुक नंबर त्रुटी दाखवत आहे.ही सर्व माहिती बरोबर टाकून देखील विमा स्वीकारला जत नाही.सर्व ऑनलाईन विमा घेत नसल्यामुळे व ते न घेण्याचे कारण कळत नसल्यामुळे आपण पीक विमा संरक्षण पासून वंचित रहातो की काय? असे शेतकऱ्याना वाटत आहे.बँकेचे अधिकारी ऑनलाईन केंद्रात जा म्हणतात.ऑनलाईन केंद्रात गेले तर आमच्या कडे होत नाही, बँकेत जा असे महा-ई-सेवा केंद्रात सांगितले जाते.
अशा टोलवाटोलवीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.त्यामुळे ऑफलाईन प्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देणेच गरज आहे, असे शेतकरी सांगत आहेत.
यासंदर्भात लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात इतर वेळा शेतकऱ्यांचा कळवळा दाखवणाऱ्या प्रतिनिधींनी ऐनवेळी शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करून पिक विमा ऑफलाईन भरून घ्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. तसेच पिक विमा भरण्याची दिलेली मुदत 31 जुलै शेवटची तारीख असल्यामुळे शेतकऱ्यांना मुदत वाढ मिळवून द्यावी, याबाबत तातडीने कार्यवाही होणे गरजेचे आहे.जेणे करून शेतकरी ऑफ लाईन विमा भरू शकतील.