लोणी तोंडार रस्त्यावर काटेरी झाडांचा विळखा; प्रवाशांना त्रासदायक
तोंडार: (संदीप बी. पाटील) : उदगीर,लोणी मोड,ते लोणी तोंडार कुमठा खु जाणाऱ्या मार्गावर काटेरी झुडपाने विळखा घातला असताना सा.बा.विभागाचे अधिकारी निद्रावस्थेत आहेत की काय? असा प्रश्न नागरिकांतुन उपस्थित होत आहे. हा मार्ग उदगीर ते लोणी मोड, लोणी, तोंडार, कुमठा खु, हेर, रोहिणा, उजळबं मार्गे चाकुर तालुक्याला जोडलेला सुलभ मार्ग आहे, व ईतर रस्ते खराब झाल्याने वाहनधारक या रस्त्यावरून प्रवास करणे अवलंबतात, रात्री बेरात्री प्रवास करणारे उदयगिरी औद्योगिक वसाहतीत व आडत लाईन मधील कामगार व ईतर सर्व सामान्य प्रवाशी प्रवास करतात, परंतु समोरुन एखादे मोठे वाहण आले तर दुचाकीस्वारांना कडेला थांबावे लागते, अन्यथा काटेरी झाडांचा सामना करावा लागतो. उदगीर शहरातील अनेक स्कुलबस या मार्गावर जातात, येतात, त्यातील लहान लेकरं बस चे खिडकीतून बाहेर वाकुन बघतात. त्यामुळे लहान लेकराला याचा त्रास होतो आहे, त्या अनुषंगाने लोणी ग्राम पंचायत ने सार्वजनिक बांधकाम विभागाला या काटेरी झाडांचा संदर्भात पत्रव्यवहार ही केला आहे. तरी त्या अधिकाऱ्याना “पुळका” कधी येणार? असा प्रश्न नागरिकांतुन व वाहणधारकातुन केला जात आहे, सध्यस्थितीत पावसाळा असल्याने लहान वाहनधारक आपापली गाडी बाजूने चालवतात परंतु एखाद्या मोठ्या वाहनांने कट मारल्यास तो दुचाकीस्वार काटेरी झाडांचा, झुडपातुन जावं लागतं आहे,तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या रस्त्यावरील काटेरी झुडपं काढुन वाहनधारकाना सोईस्कर करावे. अशी मागणी तोंडार, कुमठा खु.,हेर, रोहिणा, उजळबं येथील नागरिक व वाहनधारक करत आहेत.