अवयव दान हेच सर्वश्रेष्ठ दान – ऍड.विक्रम संकाये
उदगीर (प्रतिनीधी) : येथील श्यामलाल मेमोरियल हायस्कूल मध्ये धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय अवयव दान दिन निमित्त जाणीव जागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे सचिव ऍड.विक्रमजी संकाये होते.
याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक आनंद चोबळे, प्रभारी उपमुख्याध्यापक बालाजी चव्हाण, प्रभारी पर्यवेक्षक राहुल लिमये उपस्थित होते. याप्रसंगी धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर नामदेव बनसोडे यांनी 03 ऑगस्ट हा दिन राष्ट्रीय अवयव दान दिन म्हणून साजरा केला जातो, आपल्या देशामध्ये अवयवादानाची नितांत गरज आहे त्यासंबंधी जाणीव जागृती व्हावी म्हणून हा दिन राष्ट्रीय अवयवदान दिन म्हणून साजरा केला जातो शरीरातील महत्त्वपूर्ण अवयवाचे दान देऊन एखाद्या व्यक्तीस आपण नवीन जीवन देऊ शकतो या संबंधित विस्तृत मार्गदर्शन केले.नोटो या संस्थे अंतर्गत अवयव दानाचे कायदेशीररित्या कार्यवाही केली जाते यासंबंधी मार्गदर्शन केले, त्याचबरोबर डॉ. सचिनकुमार टाले, डॉ. अस्मिता भद्रे, डॉ. विष्णुकांत जाधव, डॉ. अभिषेक इंगळे इत्यादी तज्ञ डॉक्टरांनी राष्ट्रीय अवयवदानानिमित्त अवयव दानाचे महत्त्व विशद केले व सर्वांनी अवयव दाना विषयी समाजामध्ये जाणीव जागृती करावी यासंबंधी मार्गदर्शन केले. बालरोग तज्ञ डॉक्टर अस्मिता भद्रे यांनी बालकांचे पोषण व आहार यासंबंधी विस्तृत मार्गदर्शन केले, विद्यार्थ्यांनी सकस व पोषक आहार सेवन करावा,फास्ट फूड टाळावे, अन्न चवीसाठी नाही तर शरीराच्या पोषणासाठी, सुदृढ शरीरासाठी सेवन करावे यासंबंधी मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोप मध्ये ऍड. विक्रम संकाये यांनी राष्ट्रीय अवयव दान दिन निमित्त तज्ञ डॉक्टरांनी जे मार्गदर्शन केले त्याचा उपयोग निश्चितच समाजासाठी व विद्यार्थ्यांच्या पुढील आयुष्यामध्ये होईल अवयव दानासंबंधी जाणीव जागृती ही काळाची गरज आहे, राष्ट्रीय अवयव दानाचे औचित्य साधून नागरिकांनी गरजूंना अवयवदान करण्याचा संकल्प करावा असे मत व्यक्त केले.
राष्ट्रीय अवयव दान दिन निमित्त श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड. सुपोषपाणि आर्य, संस्था उपाध्यक्ष गिरीश मुंडकर, संस्था सहसचिव अंजुमनी आर्य यांनी अवयव दानाचा संदेश दिला
या दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
राष्ट्रीय अवयव दान दिन निमित्त कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित डॉक्टरांचे शाळेच्या वतीने मुख्याध्यापक आनंद चोबळे, प्रभारी उपमुख्याध्यापक बालाजी चव्हाण,प्रभारी पर्वेक्षक राहूल लिमये यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार व्यक्त करण्याचे कार्य उमाकांत सूर्यवंशी यांनी केले, कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी दिनेश बोळेगावे, स्वामी बस्वराज यांनी सहकार्य केले.