जडी बुटी दिन उत्साहात साजरा
उदगीर (प्रतिनिधी) : पतंजली योग समिती उदगीर, महिला पतंजली योग समिती व हरित वसुंधरा समूह यांच्या विद्यमाने सौ. चंद्रकला महादेव बिरादार यांच्या फॉर्म हाऊसवर औषधी वनस्पती दिन साजरा करण्यात आला. आचार्य बाळकृष्ण यांचा जन्मदिन जडीबुटी दिन म्हणजेच औषधी वनस्पती दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी बिराजदार यांच्या फॉर्मवर हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
त्याप्रसंगी सौ चंद्रकला बिरादार, माधवराव बिरादार, सौ.स्मिताताई पोतदार, सौ.मीनाक्षीताई स्वामी, सौ. सुमती भाताब्रे, प्रा.नरेंद्र शिंदे, मधुमती शिंदे, सौ.सुमनदेवी चव्हाण, प्रा. श्रीराम चामले, सुरेंद्र अक्कनगिरे,धनराज बिरादार, उमाकांत अंबेसंगे, ज्येष्ठ नागरिक संघाचे विश्वनाथ बिरादार,विक्रम हलकिकर, पंढरिनाथ कांबळे, रमेश पंडित, सौ.सुवर्णा सोनटक्के, सौ.सुनिता पंडित यांच्यासह अनेक महिला व पुरुष यांची उपस्थिती होती. याप्रसंगी जिल्हा महिला प्रभारी सौ. मीनाक्षीताई यांनी जडीबुटी दिन याचे महत्व सर्वांपुढे विशद केले. त्याच बरोबर धनराज बिरादार व आक्कनगिरे सुरेंद्र यांनीही जडीबुटी दिनाबद्दल चे महत्व विशद केले. पतंजलि परिवाराने मागील दहा वर्षात वृक्षारोपण करून संगोपन केलेली झाडे आज पर्यत खुप मोठी झाले आहेत, या बद्दल माहीती उमाकांत अंबेसंगे यांनी दिली. महादेव बिरादार यांनी सर्वांचे आभार मानले.