संस्कार भारती उदगीर – संगीताच्या मैफिलीला चित्रकलेचा साज

संस्कार भारती उदगीर - संगीताच्या मैफिलीला चित्रकलेचा साज

उदगीर (एल.पी.उगीले) : संस्कार भारती समिती उदगीरच्या वतीने गुरुपोर्णिमा उत्सवानिमित्त एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील गुरूतुल्य व्यक्तींचा सत्कार आणि सुगम संगीताचा चित्रकलेने नटलेला कार्यक्रम असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. संस्कार भारती देवगिरी प्रांताचे अध्यक्ष भरतअण्णा लोळगे, संस्कार भारती देवगिरी प्रांताच्या मातृशक्ति प्रमुख प्रा. स्नेहलताई पाठक, रा. स्व. संघ उदगीरचे माजी संघचालक रूक्मण पेन्सलवार व राष्ट्र सेविका समिती लातूर जिल्ह्याच्या सहकार्यवाहिका मा. सौ. सुनितीताई दंडवते यांचा यावेळी गुरूपौर्णिमे निमित्त सत्कार करण्यात आला. कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणे, ललित कलांच्या माध्यमातून राष्ट्रियत्वाचे संस्कार करणे ही संस्कार भारतीची उद्दिष्टे असून, याच भावनेने अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून आपल्या संस्कृतीतील गुरूचे अनन्यसाधारण महत्व प्रा. स्नेहलताई पाठक यांनी सत्काराला उत्तर देताना विषद केले. तर भरतअण्णा लोळगे यांनी एक भावगीत आणि गवळण गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले. व्यासपीठावर एकिकडे गायन सुरू होते तर त्याचवेळी त्या गाण्याचा आशय सर्वांसमक्ष कागदावर चितारण्याचे काम चित्रकार मंडळी करत होती. अशा. प्रकारचे एकाच वेळी दोन कलांचे थेट सादरीकरण म्हणजे एका ऐतिहासीक कार्यक्रमाचीच अनुभूती होती गोपाळ जोशी गुरूजी, श्याम कुलकर्णी, सावन टांकसाळे, संजय महापूरे, चि. वेद पाटील, डॉ. सौ. अर्चना पाटील, सौ. प्रिती दुरूगकर यांनी विविध गीते सादर केली, अरविंद सुर्यवंशी व त्यांच्या टीमने चित्रकलेची जबाबदारी लिलया पेलली. चित्रकारांच्या टीममध्ये अरविंद सूर्यवंशी यांच्याव्यतिरिक्त विशाल कांबळे, गुरुदत्त महामुनी, दीपक हरकनचे, विजय बैले, प्रमोद देवर्षे, प्रतीक कोरे, सलाउद्दीन शेख यांनी आपला सहभाग नोंदवून दाद मिळवली. जवळपास तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बालाजी पोलावार, प्रशांत मांगूळकर व सुनील सावळे उपस्थित होते. सुरूवातीला प्रतिमा पूजनानंतर संस्कार भारतीचे ध्येयगीत सादर करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना संस्कार भारती उदगीरचे अध्यक्ष सतीश उस्तूरे , आभार प्रदर्शन संस्कार भारती उदगीर चे सचिव सावन टांकसाळे तर सुत्रसंचलन सौ. अश्विनी निवर्गी यांनी केले. शुभंकर हॉलमधे पार पडलेल्या या कार्यक्रमाला उदगीर मधील रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

About The Author