महसुली प्रमाण पत्र आणि नव मतदार नांव नोंदणीचा लाभ घ्यावा – तहसीलदार शिवाजीराव पालेपाड यांचे आवाहन

महसुली प्रमाण पत्र आणि नव मतदार नांव नोंदणीचा लाभ घ्यावा - तहसीलदार शिवाजीराव पालेपाड यांचे आवाहन
अहमदपूर (गोविंद काळे) : बारावी नंतरचे उच्च शाखेच्या प्रवेशासाठी शासनाचे महसुली प्रमाणपत्र महत्त्वाचे असल्याचे सांगून ते प्रमाण पत्र जलद गतीने काढून घ्या असे आग्रही आवाहन तहसीलदार शिवाजीराव पालेपाड यांनी केले. ते यशवंत कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित महसूल व वन विभागाच्या वतीने महसूल सप्ताह आणि गरजू विद्यार्थ्यांना लाभार्थी प्रमाणपत्राच्या वाटप प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य गजानन शिंदे, व्यासपीठावर नायब तहसीलदार डी के मोरे, पेशकार प्रल्हाद रिते, उपप्राचार्य मुजमील सय्यद, उपमुख्याध्यापक राजकुमार घोटे, निवडणूक विभागाचे हरिचंद्र शेकडे, पर्यवेक्षक अशोक पेद्येवाढ यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
 यावेळी पुढे बोलताना तहसीलदार  पालेपाड म्हणाले की, ज्यांच्या वयाची 18 वर्षे पूर्ण झालेले आहेत. अशा युवकांनी बीएलओ कडे जाऊन मतदार नोंदणीचा फॉर्म भरून नाव नोंदणी अग्रक्रमाने करावे असे सांगितले.
यावेळी निवडक 10 मुला मुलींना लाभार्थी  जातीच्या, रहिवाशी, डोमीसाईल प्रमाणपत्राचे वाटप आणि मतदार नाव नोंदणीच्या फॉर्म चे वाटप तहसीलदार शिवाजीराव पालेपाड यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम तत्तापुरे यांनी सूत्रसंचालन अरुण मोरे यांनी तर आभार लक्ष्मण फड यांनी मांनले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व यशवंत
विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author