‘नो वेहिकल डे’मुळे अहमदपूरचे फुले महाविद्यालय पर्यावरण पूरक
अहमदपूर, ( गोविंद काळे ) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली नाविन्यपूर्ण असे विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणजे महाविद्यालय परिसरात व महाविद्यालयात प्रत्येक शुक्रवारी ‘नो वेहिकल डे ‘ पाळून करून महाविद्यालय पर्यावरण पूरक झाले आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिक्षेत्रात विविध क्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त केलेल्या महात्मा फुले महाविद्यालयात सामाजिक , सांस्कृतिक, क्रीडा, संशोधन, व गुणवत्तासह विविध क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणजे बालाघाटाच्या पायथ्याशी असलेल्या महात्मा फुले महाविद्यालयात पर्यावरणपूरक विविध प्रयोग यशस्वीरित्या केले आहेत. पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज ओळखून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांच्या ‘सुंदर महाविद्यालय, हरित महाविद्यालय, या संकल्पनेतून प्रत्येक शुक्रवारी ‘नो वेहिकल डे’ साजरा करण्यात येत आहे. यातून प्रदूषण मुक्त महाविद्यालय परिसर ‘ऑक्सिजन पार्क’ बनला आहे. अशी माहिती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना एन.एस.एस. कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी दिली